शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशात सपा सुस्साट! भाजपचं टेन्शन वाढलं; ४ टक्क्यांचं गणित निकाल फिरवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 11:33 IST

Uttar Pradesh Assembly Election: समाजवादी पक्षाच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज; भाजपला ९० जागांचं नुकसान

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर समाजवादी पक्ष भाजपला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. या निवडणुकीबद्दल टाईम्स नाऊ नवभारत आणि VETOनं जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून समोर आलेली आकडेवारी अतिशय रंजक आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती कोणाला, या प्रश्नाला ५२.३ टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असं उत्तर दिलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आहेत. त्यांना ३६.२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. यानंतर बसपच्या अध्यक्षा मायावती (७.२ टक्के) आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (३.४ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

व्होट शेअरमध्ये सपा सुस्साट, भाजपचं नुकसान२०१४ मध्ये देशात मोदी लाट होती. त्याचा फायदा भाजपला उत्तर प्रदेशात झाला. भाजपला जवळपास ४० टक्के मतं मिळाली होती. यात आता घट होऊ शकते. भाजपला ३८.२० टक्के मतं मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत सपाला केवळ २२ टक्के मतं मिळाली होती. मात्र आता सपा आणि मित्रपक्षांना ३४ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. 

कोणाला किती जागा?गेल्या निवडणुकीत भाजपनं ३१२ जागा मिळवत सत्ता स्थापन केली होती. आता त्यांच्या जागा २२३ पर्यंत कमी होऊ शकतात. गेल्या निवडणुकीत ४७ जागा जिंकणारा सपा यंदा १५२ जागा जिंकू शकतो. २०१७ मध्ये १९ जागा जिंकणाऱ्या बसपला १३ जागा मिळू शकतात. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादवyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा