शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस तृणमूलमध्ये विलीन करायची वेळ आलीय, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 13:58 IST

भाजपने गुरुवारी पाचपैकी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भाजपने गुरुवारी पाचपैकी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "भाजपला राष्ट्रीय पातळीवर लढा देण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे. काँग्रेस पक्षाचं तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन होण्याची वेळ आली आहे", असं विधान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केलं आहे. काँग्रेसनं तृणमूलमध्ये विलीन होऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावं, असा सल्ला तृणमूलच्या नेत्यांनी काँग्रेसला देऊ केला आहे. ममता बॅनर्जीच भाजपाचा पराभव करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.  "काँग्रेससारखा जुना पक्ष का नाहीसा होत आहे, हे मला समजत नाही. आम्हीही या पक्षाचा भाग होतो. काँग्रेसने टीएमसीमध्ये विलीन व्हावे. हीच योग्य वेळ आहे. मग राष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या तत्त्वांवर आपण (नथुराम) गोडसेच्या तत्त्वांना मात देऊ शकतो", असं तृणमूल काँग्रेसचे नेते आणि राज्याचे परिवहन व नगर विकास मंत्री फिरहाद हकीम म्हणाले. 

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनीही हकीम यांच्याच प्रतिक्रियेची री ओढली. "काँग्रेस भाजपसारख्या शक्तीशी लढू शकत नाही, असे आम्ही खूप दिवसांपासून म्हणत आलो आहोत. भाजपविरोधात लढण्यासाठी ममता बॅनर्जींसारख्या नेत्याची गरज आहे. काँग्रेसने हे समजून घेतले पाहिजे", असं कुणाल घोष म्हणाले. 

यापूर्वी, टीएमसीचे मुखपत्र असलेल्या 'जागो बांगला' मधूनही अनेकदा काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. "भाजपच्या विरोधात विरोधी शक्तींची एक शक्तिशाली युती बनवण्याऐवजी काँग्रेसनं स्वतःला केवळ ट्विटरवर मर्यादित ठेवलं आहे", अशी टीका या वृत्तपत्रातून काँग्रेसवर करण्यात आली होती.  आपल्याला भाजपचा पर्याय हवा आहे, भाजपविरोधात आघाडी हवी आहे. असे आम्ही अनेकवेळा म्हटले आहे, अगदी काँग्रेसलाही याची कल्पना दिली आहे. पण त्याचं काहीच झालं नाही. आमच्या नेत्याने (ममता बॅनर्जी) युतीसाठी एक फ्रेमवर्क, एक सुकाणू समिती, धोरण आणि कृती मार्गाची मागणी केली आहे. मात्र, काहीही केलं गेलं नाही. काँग्रेस स्वतःला फक्त ट्विटरवर मर्यादित ठेवण्यात आनंदी आहे, असा घणाघाती हल्ला 'जागो बांगला' मधून करण्या आला होता. 

तृणमूल काँग्रेस गोव्यात चांगलं प्रदर्शन करण्यात अपयशी ठरली आणि त्यांना एकही जागा मिळाली नाही. त्यांचा निवडणूक सहयोगी महाराष्ट्र गोमंतक पक्ष (एमजीपी) ने दोन जागा जिंकल्या असून ते भाजपला पाठिंबा देणार असल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे तृणमूलचे नेतेही चांगलेच संतापले आहेत. "आम्ही गोव्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि आम्हाला मिळालेल्या मताधिक्याने आम्ही समाधानी आहोत. परंतु, एमजीपीने काय निर्णय घेतला यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. त्या निर्णयाबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही", असं कुणाल घोष म्हणाले. 

दरम्यान, बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी टीएमसीच्या प्रस्तावावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. "टीएमसी भाजपचा सर्वात मोठा एजंट आहे. जर ते भाजपविरोधात लढण्यास गंभीर असतील तर त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे", असा प्रतिसल्ला अधीर रंजन चौधरी यांनी देऊ केला आहे. 

गोवा विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या कामगिरीची मात्र भाजप नेतृत्वाने खिल्ली उडवली. "पुढील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधानपदाचा चेहरा असतील. गुरुवारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे की पश्चिम बंगालच्या बाहेर टीएमसी नाही. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आता पंजाबमध्येही सरकार स्थापन करेल. परिणामी, आता विरोधकांचा चेहरा कोण, ममता की केजरीवाल हे त्यांनीच ठरवावे", असं भाजपा प्रदेशाध्यक्षा सुकांता मजुमदार म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसElectionनिवडणूक