शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अडचणींचा सामना केल्यानंतर आता सेलिब्रेशनची वेळ- दीपिका पादुकोण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 10:41 IST

संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत सिनेमा अनेक वादविवादानंतर अखेरीस आज प्रदर्शित झाला आहे.

मुंबई- संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत सिनेमा अनेक वादविवादानंतर अखेरीस आज प्रदर्शित झाला आहे. राज्यात व देशात ठिकठिकाणी सिनेमाला विरोध केला जात असता तरी हा विरोध झुगारून लोक सिनेमा पाहण्यास प्राधान्य देत आहेत. चार मोठ्या राज्यात सिनेमाला एन्ट्री नसली तर इतर ठिकाणी तिकीट विक्री जोरदार सुरू आहे. पद्मावत सिनेमा वादात सापडल्यानंतर सिनेमातील कलाकारांनी सिनेमावर किंवा सिनेमातील वादावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. पण आता सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर सिनेमात राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पादुकोणने प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात दीपिका पोलीस सुरक्षेत पोहचली होती. मोठ्या प्रतिक्षेनंतर आणि अडचणीनंतर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आता सेलिब्रेशन करण्याची वेळ आली आहे, अशी भावना दीपिकाने व्यक्त केली. पद्मावत सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून एक बेंचमार्क स्थापन करेल, असं विश्वास दीपिकाने व्यक्त केला आहे. 

'मी सध्या खूप भावूक आहे. सिनेमाने खूप अडचणींचा सामना केला आहे. सगळ्या अडचणींना तोंड दिल्यानंतर सिनेमा अखेरीस प्रदर्शित झाला. सिनेमाच मी निभावेलल्या भूमिकेला प्रेक्षक दाद देत आहेत. सिनेमासाठी मी खूप उत्साही असून आता सेलिब्रेशनची वेळ आली आहे, असं दीपिकाने म्हंटलं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आता सिनेमा व आमच्या कामामुळे त्याचं उत्तर मिळेल. आम्ही आमच्या कामातूनच आता सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. यापेक्षा दुसरा चांगला पर्याय कुठलाही नाही. खरंतर मी माझ्या सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरील कलेक्शनबद्दल उत्साही नसते पण पद्मावत सिनेमाच्या बिझनेसबद्दल मी खूप उत्साही आहे. सिनेमा बॉक्सऑफिस कलेक्शनवर धूम करेल, असा विश्वास दीपिकाने व्यक्त केला. 

'पद्मावत'ला 4 मोठ्या राज्यांत एन्ट्री नाहीच; मात्र महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व दक्षिणेत जोरदार तिकीटविक्रीसंजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमाला होणारा विरोध पाहता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक भागांमध्ये राजपूत संघटना आणि करणी सेनेकडून हिंसक आंदोलनं सुरू आहेत.  

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व गोवामध्ये पद्मावतविरोधात हिंसक आंदोलनं होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरातील ७५ टक्के मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचे प्रतिनिधित्व करणा-या ‘मल्टिप्लेक्स असोसिएसन आॅफ इंडिया’ या संघटनेने संभाव्य हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ हा चित्रपट न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणPadmavatपद्मावतSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळी