आजअखेर 21 लाखांची कर वसुली महुद ग्रामपंचायत : 33.31 लाख कर वसुलीचे उद्दिष्ट
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
सांगोला :
आजअखेर 21 लाखांची कर वसुली महुद ग्रामपंचायत : 33.31 लाख कर वसुलीचे उद्दिष्ट
सांगोला : महुद बु़ येथील ग्रामपंचायतीच्या घरप?ी व पाणीप?ी कर वसुली धडक मोहिमेस मालमत्ताधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकाच दिवसात 5 लाख 35 हजार रुपयांची विक्रमी कर वसुली करण्यात आली. चालू वर्षातील 33 लाख 31 हजार 583 कर वसुलीच्या उद्दिष्टापैकी आजअखेर 21 लाख रुपयांची कर वसुली झाली आह़ेमहुद बु ॥ ग्रामपंचायतीकडे 3178 मालमत्ताधारकांची नोंद असून, 905 नळ कनेक्शन जोडणी करण्यात आली आहे. सन 2014-15 या आर्थिक वर्षाकरिता ग्रामपंचायतीकडून 33 लाख 31 हजार 583 घरप?ी व पाणीप?ीच्या उद्दिष्टापैकी 15 लाख 43 हजार 69 रुपयांची कर वसुली यापूर्वीच करण्यात आली आहे. टाळाटाळ करणार्यांसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. गटविकास अधिकारी राहुल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुलीची दोन पथके नेमण्यात आली आहेत. या पथकात गटविकास अधिकारी राहुल गावडे व द्वितीय पथकात सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल कोळेकर, कृषी विस्तार अधिकारी पवार, विस्तार अधिकारी नागटिळक माने, काळे, बुवा पोतदार, ग्रामसेवकांचा समावेश आहे.कोट ::::::::::::::::महुदमध्ये धडक कर वसुली मोहिमेस मालमत्ताधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपंचायतीने पथकाविना आपापल्याकडील कर वसुली करण्यासाठी पुढाकार घ्यावा.- विठ्ठल कोळेकरसहा. गटविकास अधिकारीकोट ::::::::::::::::::::::तालुक्यात 76 ग्रामपंचायती असून मोठय़ा कर वसुलीच्या ग्रामपंचायतीमध्ये महुद ग्रामपंचायतीचा समावेश होतो. पथकाने आजपावेतो कोळा, नाझरा, घेरडी या गावातून सुमारे 8 लाख रुपयांची कर वसुली केली आहे. महुद ग्रामपंचायतीच्या धडक कर वसुली मोहिमेस मालमत्ताधारकाचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याने 33 लाख रुपयांचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीकडून पूर्ण केले जाईल.- राहुल गावडे,गटविकास अधिकारी