शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कौतुकास्पद! 39 वर्षांपासून गावात एकही गुन्हा नाही; लोकांनी कोर्ट-पोलीस स्टेशन पाहिलंच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 10:52 IST

गावातील लोकांना गेली 39 वर्षे म्हणजे 1983 पासून पोलीस स्टेशनची गरजच भासली नाही. 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत असतात. पण असं असताना एक कौतुकास्पद घटना आता घडली आहे. मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथे गेल्या 39 वर्षांपासून पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. गावातील लोक पंचायत भरवून परस्पर संमतीने प्रकरणे सोडवतात. त्यामुळे लोकांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरजच पडत नाही. ओरछा या धार्मिक आणि पर्यटन शहराजवळ वसलेले हाथीवर खिरक हे असं गाव आहे की, जिथे गावातील लोकांना गेली 39 वर्षे म्हणजे 1983 पासून पोलीस स्टेशनची गरजच भासली नाही. 

पोलीस ठाण्यात 39 वर्षांत आतापर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. गावातील लोकही पोलीस ठाणे आणि न्यायालयापासून लांब राहतात. जेव्हा पृथ्वीपूरचे एसडीओपी संतोष पटेल या गावात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की गावातील लोक पोलिसांना ओळखत नाहीत. प्यारी बाई पाल या 100 वर्षांच्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिने गावात कधीही वाद पाहिलेला नाही. पोलीस गावात आले आहेत. पोलीस कसे असतात हे तिला माहीत नाही. गावात कोणताही वाद नसल्याचे गावातील अनेक ज्येष्ठ व तरुण सांगतात. किरकोळ वाद असतील तर ते गावातील ज्येष्ठ मंडळी पंचायत स्तरावर परस्पर संमतीने सोडवतात.

पृथ्वीपूरचे एसडीओपी संतोष पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मला कळले की या गावात 39 वर्षांपासून पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही, तेव्हा हे गाव पहिलं. तिथल्या लोकांशी बोलून व्हिलेज क्राइम नोटबुक तपासले असता 1983 पासून इथे एकही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळाली. शांतताप्रिय असलेल्या या गावात एक व्यक्ती असामाजिक स्वभावाचा होता पण तो आता गावात राहत नाही. हाथीवर खिरक गावात 225 लोक राहतात. कमी लोकवस्ती असलेल्या या गावात शांतता आणि आनंददायी वातावरण आहे.

गावात पाल आणि अहिरवार बा ब्राह्मण समाजाचे लोक राहतात. सर्व समाजातील लोक परस्पर बंधुभावाने मिळून मिसळून राहतात. सुख-दुःखात नेहमी एकमेकांना साथ देतात. दुरावा, वाद यांसारखी परिस्थिती निर्माण झाली तरी जेष्ठ मंडळी समजूत घालून शांत करतात. हाथीवर खिरक गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीसोबतच शेळी, गाय यांसारखे प्राणी पाळणे हा आहे. शेळीपालनामुळे त्यांना रोजगार मिळतो, त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्नही मिळते. गायींच्या संगोपनामुळे गावातील लोकांना दुधाची कमतरता भासत नाही. गावातील लोकही तूप, दुधाचा व्यवसाय करतात. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एका हिंदी  वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस