शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात तिकीटवाटपात दिला घराणेशाहीलाच कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 12:45 IST

काँग्रेसला लक्ष्य करणाऱ्या पक्षाचे आपल्या कृतीवर मात्र मौन

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये येत्या १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत उमेदवारी देताना भाजपसहित सर्व पक्षांनी घराणेशाही कायम राहील, अशी तजवीज केली आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावर काँग्रेसला लक्ष्य करणाऱ्या भाजपने कर्नाटकमधील आपल्या नेत्यांच्या नातेवाइकांना दिलेल्या उमेदवारीबद्दल मात्र सोयीस्कर मौन बाळगले आहे. भाजप उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास तिथेही घराणेशाहीला झुकते माप दिल्याचे स्पष्ट दिसून येते. 

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना शिवमोग्गा जिल्ह्यातील शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट. विजयेंद्र यांचे थोरले बंधू लोकसभेचे खासदार आहेत. 

मंत्र्यांच्या नातेवाइकांना दिले तिकीटवाहतूकमंत्री बी. श्रीरामुलू व त्यांचे पुतणे टी. एच. सुरेश बाबू यांना निवडणुकांत उमेदवारी दिली. पर्यटनमंत्री आनंदसिंह यांच्याऐवजी त्यांचा पुत्र सिद्धार्थसिंह यांना विजयनगर येथून तिकीट दिले. काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांनी बलाढ्य नेत्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी देण्यात हात आखडता घेतला नव्हता.

आणखी कोण कोण?n खाणमालक व वादग्रस्त नेते गोली जनार्दन रेड्डी यांचे दोन बंधू सोमशेखर रेड्डी व करुणाकर रेड्डी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. n रमेश जारकीहोली व बालचंद्र जारकीहोली या बंधूंना तर दिवंगत नेते उमेश कट्टींचे पुत्र निखिल कट्टी व त्यांचे काका रमेश कट्टी यांना रिंगणात उतरविले.n भाजपचे विद्यमान आमदार अरविंद लिंबावली यांची पत्नी मंजुळा अरविंद, मंत्री शशिकला जोल्ले यांचे पती अण्णासाहेब जोल्ले यांना तिकीट दिले आहे. n चिंचोलीतील उमेदवार अविनाश जाधव खासदार उमेश जाधव यांचे पुत्र, तर चंद्रकांत पाटील विधानपरिषदेचे माजी सदस्य बी. जी. पाटील यांचे पुत्र आहेत.

माजी मुख्ममंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र व विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत. 

लोकसभा खासदार व भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचे नातेवाईक रवी सुब्रमण्य यांना तिकीट मिळाले आहे. 

खासदार कराडी सगण्णा यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांची सून मंजुळा अमरेश यांना विधानसभेची उमेदवारी दिली. 

टॅग्स :ElectionनिवडणूकKarnatakकर्नाटक