शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

थम्ब इम्प्रेशनने निघणार एटीएममधून पैसे, सायबर गुन्ह्यांवर अंकुश लावण्याचे प्रयत्न   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 18:37 IST

अमरावती : कार्डऐवजी यापुढे थम्ब इम्प्रेशनचा वापर करून एटीएममधून पैसे काढले जाणार आहेत. ही बायोमेट्रिक प्रणाली पुढील काळात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॉर्पोरेट सेंटरकडे विचारधीन आहे.

वैभव बाबरेकरअमरावती : कार्डऐवजी यापुढे थम्ब इम्प्रेशनचा वापर करून एटीएममधून पैसे काढले जाणार आहेत. ही बायोमेट्रिक प्रणाली पुढील काळात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॉर्पोरेट सेंटरकडे विचारधीन आहे. गेल्या काही वर्षांत सायबर गुन्हेगारीने नवनवीन फंडे वापरून बँक खात्यांमधील रक्कम लंपास करण्याचा सपाटा लावला आहे. पूर्वी एटीएमचे पिन विचारले जायचे. आता तर काहीही न विचारताही पैसे काढले जात आहेत. खातेदारांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाने आता बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्याचा प्रस्ताव आखला आहे. प्रत्येक नागरिकाचे फिंगरप्रिंट वेगवेगळे असते. त्यामुळे सरकारी कर्मचा-यांना थम्ब इम्प्रेशनने सेवेवर हजर असल्याची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने करावी लागते. हीच थम्ब सिस्टीम आता एटीएमसाठी लागू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. एटीएममध्ये कार्डऐवजी थम्ब इम्प्रेशनने खातेदारांना पैसे काढता येणार आहे. या प्रणालीमुळे एटीएम कार्ड वा पासवर्डची गरज राहणार नसली तरी प्रत्येकाचे फिंगरप्रिंट वेगवेगळे असल्याने कुणालाही कुणाचेही पैसे सहज काढता येणार नाहीत. ही पद्धती कार्यान्वित करण्याचे मुंबई येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कारार्पेरेट सेंटरकडे प्रस्तावित असून, लवकरच ती लागू झालेली असेल, अशी माहिती बँक अधिका-यांनी दिली. 

नागरिकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून केले जात आहेत. यासाठी आगामी काळात एटीएममध्ये थम्ब इम्प्रेशन सिस्टीम लागू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर प्रस्तावित आहे. अश्विन चौधरी, मुख्य प्रबंधक, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय

टॅग्स :atmएटीएमAmravatiअमरावती