वाघ बंधुंचे यश अहमदनगर : अशोकभाऊ फिरोदिया मेरिट फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत पहिलीतील ओम वाघ व हरिष वाघ यांनी उल्लेखनीय यश मिळविले. परीक्षेत ओम प्रथम तर हरिष सातवा आला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...............रक्तदान शिबिरअहमदनगर : कोहिनूर टेक्निकल इन्स्टट्यिूटमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्याने २५ रक्त पिशवीचे संकलन झाले. शिबिराला सुधीर ताठे, जनकल्याण रक्तपेढीचे भाऊसाहेब कोठी, सुरेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. ...................शहीद दिवस साजराअहमदनगर : शहरातील मखदूम सोसायटीच्यावतीने २३ मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी राजू फें्रड सर्कलचे सय्यद आसिफ, शेख परवेज, शेख आसीम, शेख जावेद, सय्यद शकिल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आबीद खान, प्रास्ताविक राजू शेख तर आभार कमर सुरूर यांनी मानले. ...................गव्हाची सांेगणी वांबोरी : वांबोरी परिसरात गहू पिकाची सांेगणी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. मागील १५ दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने परिसरातील गव्हाची सांेगणी रखडली होती. मात्र, त्यानंतर आठ दिवसांपासून पुन्हा सोंगणीला वेग आला आहे. पुढील महिनाभरात संपूर्ण गहू पिकाची सोंगणी पूर्ण होणार आहे. ......................
्रसिंगल न्यूज
By admin | Updated: March 24, 2015 23:36 IST