शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 07:03 IST

बॉम्बस्फोटाच्या धमक्या, आता घुसखोरी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत एका मास्कधारी व्यक्तीने सोमवारी दुपारी भरधाव एसयूव्ही थेट विधानसभा संकुलात घुसवली. दुपारी २ च्या सुमारास घडलेल्या या थरारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, घुसखोराने विधानसभेच्या गेट क्रमांक दोन समोरील बॅरिकेड्स अक्षरशः उडवले आणि गाडी थेट आत नेली.

विधानसभेचे अधिवेशन सुरू नसल्याचा फायदा घेत या व्यक्तीने सुरक्षा व्यवस्था भेदली. आत घुसल्यानंतर त्या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर एक पुष्पगुच्छ ठेवला आणि तिथून तातडीने पळ काढला. संशयास्पद पुष्पगुच्छ आढळताच बॉम्बशोधक पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसराची तपासणी केली, मात्र संशयास्पद साहित्य आढळले नाही.

बॉम्बस्फोटाच्या धमक्या, आता घुसखोरी

पोलिसांनी सांगितले की, दिल्ली विधानसभा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. या भागात घुसखोरी करणारे लोक व त्यातील व्यक्ती यांच्या शोधासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली. शेजारच्या राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पोलिसांनी वेगाने तपास करून विधानसभा परिसरात घुसखोरी करणारे वाहन व चालकासह तीन जणांना दिल्लीच्या उत्तर भागातून ताब्यात घेतले आहे. दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बॉम्बस्फोटाच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर आता या वास्तूच्या परिसरात वाहनाने घुसखोरी केल्याने सुरक्षा व्यवस्थेचे बिंग फुटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : SUV breaches Delhi Assembly security, triggers chaos and investigation.

Web Summary : A masked man drove an SUV into the Delhi Assembly complex, breaching security. He left a bouquet, prompting a bomb squad search. Police apprehended three individuals and the vehicle, revealing security lapses following bomb threats during the budget session.
टॅग्स :delhiदिल्लीvidhan sabhaविधानसभाAccidentअपघात