शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिलांनी थोपटले प्रस्थापितांविरुद्ध दंड, काँग्रेस एका तर डावे दोन ठिकाणी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 04:27 IST

गेल्या आठवड्यात काँग्रेस नेत्या लतिका सुभाष यांनी तर मुंडण केले. त्यांना एट्टमनूर मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

कोळीकोड : आपल्याविरुद्ध अन्याय झाल्याचे सांगत केरळ विधानसभेच्या निवडणुकीत तीन महिलांनी प्रस्थापितांविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यांचा विजय कितपत होईल, याची खात्री नसली तरी त्यांची उमेदवारी सर्वांच्या चर्चेचा विषय मात्र बनली आहे.

गेल्या आठवड्यात काँग्रेस नेत्या लतिका सुभाष यांनी तर मुंडण केले. त्यांना एट्टमनूर मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांची ही बंडखोरी काँग्रेसला अडचणीत आणू शकेल. महिलांना काँग्रेसने पुरेसे प्रतिनिधित्व न दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.राज्याच्या पलक्कड जिल्ह्यातील वायलर भागात १३ व १९ वर्षे वयाच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण व नंतर हत्या हे प्रकरण २०१७ साली खूप गाजले होते. पण, त्या प्रकरणाचा छडा अद्याप लागलेला नाही. त्यामुळे त्या दोन मुलींच्या आईने गेल्या महिन्यात डोक्याचे मुंडण केले, राज्यभर दौरे केले. आपल्या मुलींवर अत्याचार करून त्यांना मारून टाकल्याचा तिचा आरोप आहे. तिनेे धर्मदाममध्ये मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे काँग्रेसने तिथे उमेदवार न देता या महिलेला पाठिंबा दिला आहे. 

आघाडीची पंचाईत- क्रांतिकारक मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाचे नेते टी. पी. चंद्रशेखरन यांची २०१२ झाली हत्या झाली होती. अद्याप त्या प्रकरणातील आरोपींनाही शिक्षा झालेली नाही. - त्यामुळे त्यांच्या पत्नी के. के. रेमा यांनी वडकारामधून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. त्यांनाही काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे डाव्या आघाडीच्या उमेदवाराची तिथे पंचाईत होईल.

टॅग्स :KeralaकेरळKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेसElectionनिवडणूक