शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

लोकसभेबरोबर महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका? भाजपाची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 06:52 IST

लोकसभा निवडणुकांबरोबरच महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेता येतील का याची चाचपणी भाजपाने सुरू केली आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांबरोबरच महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेता येतील का याची चाचपणी भाजपाने सुरू केली आहे. एकत्र निवडणुकांचे पक्षाच्या कामगिरीवर कोणते बरेवाईट परिणाम होऊ शकतात याचा अभ्यासही सुरू केला आहे.या तीन राज्यांमध्ये पुढील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. लोकसभा निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होतील. दोन्हीनिवडणुका एकत्र घेतल्यास ते पक्षाला कितपत फायदेशीर ठरेल याविषयी विचारमंथन सुरू आहे.झारखंड, हरयाणामध्ये भाजपाचे स्वबळावर सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ व शिवसेनेला ६३ जागांवर विजय मिळाला होता. त्यांचे युतीचे सरकार राज्यात सत्तेत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपाशी युती केली होती. मात्र विधानसभेत दोघे स्वतंत्रपणे लढले होते.भाजपाचा मुख्यमंत्री राज्यात सत्तेवर आहे, ही सल शिवसेनेच्या मनात आहे. लोकसभेबरोबर तीन राज्यांतील निवडणुका घेतल्या व पुन्हा मोदीलाट आल्यास भाजपाला पूर्वीपेक्षा मोठा विजय मिळेल असे पक्षातील काही धुरिणांना वाटत आहे. या निवडणुकांत सेनेबरोबर युती करावी असेही काही भाजपा नेत्यांना वाटते. झारखंडमध्ये झारखंड विकास मोर्चाचे बाबुलाल मरांडी यांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. झारखंडच्या ८१ सदस्य असलेल्या विधानसभेत मरांडींच्या पक्षाचे आठ आमदार होते. त्यातील सहा आमदार भाजपाने फोडल्याने मरांडी नाराज आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसच्या आघाडीमध्ये मरांडी यांनी सामील होऊ नये यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. सेनेला मुख्यमंत्री पद देण्यास विरोधमहाराष्ट्रात शिवसेना दूर जाणे भाजपाला परवडणारे नाही. पक्षाच्या कोअर ग्रुपमधील एका नेत्याने निराळा सूर लावला. त्याने सांगितले की, भाजपाने महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद कधीही शिवसेनेला देऊ नये. त्यापेक्षा स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका घेण्याचीगरज नाही. मात्र एनडीए मजबूत करण्याची वेळ आली आहे, असा संदेशअमित शहा यांनी दिल्याचेही तो म्हणाला.

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारत