शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

चार दिवसांत तीन राफेल भारताकडे झेपावणार; एप्रिलमध्ये आणखी 9 लढाऊ विमाने ताकद वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 1:48 PM

three more Rafale omni-role fighters on their way: भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पायलट प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्ये सात राफेल लढावू विमाने सध्या वापरली जात आहेत. पहिले राफेल विमान 29 जुलैला भारतात दाखल झाले होते. फ्रान्सने 59 हजार कोटी रुपयांना भारताला 36 लढाऊ विमाने देण्याबाबत 2015 मध्ये करार केला होता.

येत्या काही दिवसांत भारतीय हवाईदलाची (Indian Air Force) ताकद आणखी वाढणार आहे. फ्रान्सची कंपनी दसॉल्ट एव्हीएशन आणखी तीन विमाने (three more Rafale omni-role fighters )पुढील चार दिवसांता भारताकडे सुपूर्द करणार आहे. ही विमाने अंबालाच्या हवाई दलावर उतरणार आहेत. याचबरोबर एप्रिलमध्ये आणखी नऊ विमाने भारतात दाखल होणार आहेत. (3 Rafale fighters landing next week, 9 more in April to add to IAF’s )

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पायलट प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्ये सात राफेल लढावू विमाने सध्या वापरली जात आहेत. पहिले राफेल विमान 29 जुलैला भारतात दाखल झाले होते. फ्रान्सने 59 हजार कोटी रुपयांना भारताला 36 लढाऊ विमाने देण्याबाबत 2015 मध्ये करार केला होता. गेल्या वर्षी 10 सप्टेंबरला पहिले राफेल अंबालामध्ये हवाई दलात दाखल झाले होते.

भारतीय हवाईदलाने एप्रिलच्या मध्यावर राफेल लढाऊ विमानांच्या दुसऱ्या स्क्वाड्रनच्या तैनातीची तयारी केली आहे. ही स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हाशिमारा हवाई तळावर तैनात केली जाणार आहे. राफेलची पहिली स्क्वाड्रन हिमाचलच्या अंबाला हवाई तळावर तैनात आहे.

तीन राफेल लढाऊ विमाने भारतात आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची टीम फ्रान्समध्ये गेली आहे. ही विमाने 30 किंवा 31 मार्चला भारतात येतील असे फ्रान्स आणि भारतीय राजदूतांनी सांगितले. फ्रान्सच्या बोरदू शहरातील मेरिगनेक हवाई तळावरून ७००० किलोमीटरचे अंतर पार करून ही विमाने भारतीय हवाई हद्दीत येतील. मध्येच हवेतच इंधन भरणे आणि अरब अमिरातमध्ये विश्रांतीसाठी ही विमाने काही काळ थांबतील. पहिल्यावेळेला  पाच विमाने भारतात येत असतानाच ३०,००० फूट उंचीवर त्यांनी इंधने भरली आहेत. कोरोना संकटामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनची अडचण येऊनही कंपनीने त्यापैकी पहिल्या तुकडीतील विमाने ठरल्यावेळी सुपूर्द केली आहेत.

राफेलच्या कमांडिंग ऑफिसरची अचानक बदलीबऱ्याच वादंगानंतर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात फ्रान्सची राफेल लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. मात्र, काही महिन्यांतच राफेलच्या पहिल्या स्क्वाड्रनचे कमांडिग अधिकारी ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंग यांची अचानक बदली करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी त्यांची बदली करण्यात आली होती. हरकीरत सिंग यांची बदली शिलाँगच्या पूर्व एअर कमांडच्या मुख्यालयात करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी अंबाला एअरबेसवर कॅप्टन रोहित कटारिया राफेल विमानांची 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनची (17 Golden Arrow Squadron) जबाबदारी सांभाळणार आहेत. (The Hasimara forward base in north Bengal will start operations with five fighters next month)

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलFranceफ्रान्सindian air forceभारतीय हवाई दल