शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक व्हीआयपी व्यक्तीच्या संरक्षणासाठी तीन पोलीस, पण 663 सर्वसामान्य माणसांच्या संरक्षणासाठी फक्त एक पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 12:35 IST

केंद्र सरकारने मध्यंतरी सरकारी गाडीवर लाल दिवा वापरण्यास बंदी घालून व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले.

ठळक मुद्देदेशात एका व्हीआयपी व्यक्तीच्या संरक्षणासाठी सरासरी तीन पोलीस तैनात असतात. 56,944 पोलीस 29 राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेशातील 20 हजार 828 व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.

नवी दिल्ली, दि. 18 - केंद्र सरकारने मध्यंतरी सरकारी गाडीवर लाल दिवा वापरण्यास बंदी घालून व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले. पण अजूनही व्हीआयपी संस्कृती ठळकपणे दिसून येईल अशा अनेक गोष्टी अस्तित्वात आहेत. त्यापैकीच एक आहे पोलीस संरक्षण. देशात एका व्हीआयपी व्यक्तीच्या संरक्षणासाठी सरासरी तीन पोलीस तैनात असतात. देशात आजच्या घडीला जवळपास 20 हजार व्हीआयपी व्यक्ती आहेत. तेच सर्वसामान्य माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो. तेव्हा मात्र पोलीस दल अपुरे असल्याचे कारण पुढे केले जाते. 

पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ब्युरोच्या अहवालातून व्हीआयपी आणि सर्वसामान्यांसाठी तैनात पोलिसांमध्ये किती तफावत आहे त्याची माहिती समोर आली आहे. देशात एकूण 19.26 लाख पोलीस अधिकारी आहेत. त्यापैकी 56,944 पोलीस 29 राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेशातील 20 हजार 828 व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. लक्षद्विप या केंद्रशासित प्रदेशात कोणत्याही व्यक्तीला पोलीस संरक्षण दिलेले नाही. 

सर्वसामान्यांच्या संरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा 663 भारतीयांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस तैनात असतो. अनेक व्हीआयपीसाठी जिवाला असणा-या धोक्यापेक्षा आपण पोलीस संरक्षणात फिरतो हा त्यांच्यासाठी  अभिमानाचा विषय असतो. कारण अनेक जण पोलीस संरक्षण प्रतिष्ठेचे लक्षण समजतात. केंद्र सरकारने लाल दिवा वापरण्यावर बंदी आणली पण पोलीस दल राज्यांच्या अखत्यारीत येते. कोणाला संरक्षण द्यायचे, कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. 

उत्तर आणि पूर्व भारतात व्हीआयपी क्लचर प्रकर्षाने जाणवते. बिहारमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत सर्वसामान्यांसाठी फारच कमी पोलीस उपलब्ध असतात. बिहारमध्ये 3200 व्हीआयपीच्या संरक्षणासाठी 6,248 पोलीस तैनात आहेत. पश्चिम बंगालमध्येही व्हीआयपी क्लचर जपण्यासाठी पोलीस दलाचा मोठया प्रमाणावर वापर होतो. पश्चिम बंगालमध्ये 4,233 पोलीस 2,207 व्हीआयपीचे संरक्षण करतात. जम्मू-काश्मीरमध्ये 4,499 पोलीस 2,075 व्हीआयपींचे संरक्षण करतात. उत्तरप्रदेशात 4,681 पोलीस 1,901 व्हीआयपीच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यातुलनेत महाराष्ट्रात हा आकडा कमी आहे. महाराष्ट्रात 74 व्हीआयपीच्या सुरक्षेसाठी 961 पोलीस तैनात आहेत.  

टॅग्स :Policeपोलिस