आरोग्य अभियानात आणखी तीन योजनांचा समावेश
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
बुलडाणा : राष्ट्रीय आरोग्य अभियानात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम या तीन मुख्य योजनांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य अभियान जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहोचावे, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली असून, या योजनेला ७५ टक्के केंद्र आणि २५ टक्के राज्य शासनाकडून अनुदान मिळणार आहे.
आरोग्य अभियानात आणखी तीन योजनांचा समावेश
बुलडाणा : राष्ट्रीय आरोग्य अभियानात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम या तीन मुख्य योजनांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य अभियान जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहोचावे, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली असून, या योजनेला ७५ टक्के केंद्र आणि २५ टक्के राज्य शासनाकडून अनुदान मिळणार आहे.गरजुंना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी २००५ पासून देशात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले. २०१४-१५ मध्ये सर्व केंद्र पुरस्कृत आरोग्य योजना एकत्रित करून योजनेचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान असे ठेवण्यात आले होते; मात्र योजनेची प्रभावी अंमलबाजावणी करण्यासाठी आणि गोरगरिबांपर्यत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या हेतूने यात आणखी तीन योजनांचा समावेश करण्यात आला. (प्रतिनिधी)बॉक्सअकरा योजनांना मिळणार अनुदानकेंद्र व राज्याकडून मिळणारी रक्कम अकरा योजनांमध्ये कामी लावण्याचे निर्देश आहेत. यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंधक व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हद्यरोग आणि पक्षाघात प्रतिबंधक व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, फ्लोरोसिस प्रतिबंधक कार्यक्रम, राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम आणि राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा समावेश आहे.