शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन ‘चेटकिणीं’चा खून करणाऱ्यांची फाशी केली रद्द; शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 01:31 IST

देहदंडाची शिक्षा देऊन समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन होणार नाही, असे नमूद करीत कोलकाता उच्च न्यायालयाने ‘चेटकिणी’ असल्याच्या संशयावरून तीन महिलांचा खून करणाºया सात पुरुष आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली.

कोलकाता : देहदंडाची शिक्षा देऊन समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन होणार नाही, असे नमूद करीत कोलकाता उच्च न्यायालयाने ‘चेटकिणी’ असल्याच्या संशयावरून तीन महिलांचा खून करणाºया सात पुरुष आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली.पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील दुबराजपूर व हरिदासपूर या गावांतील रोगराई व अकाली मृत्यू या तिघींनी ‘चेटूक’ केल्याने होत असल्याचा निष्कर्ष गावातील ज्येष्ठांंनी पंचायत भरवून काढल्यानंतर संबारी सिंग, फुलमणी सिंग व सोंबारी सिंग या तिघींना दगड-काठ्यांनी ठेचून ठार मारले होते. ही घटना १६ आॅक्टोबर २०१२ रोजी घडली होती. यावरून दाखल झालेल्या खटल्यात सत्र न्यायालयाने सात आरोपींना फाशी व दोघांना जन्मठेप ठोठावली होती. खून झालेल्या महिला व सर्व आरोपी मुंडा या आदिवासी समाजातील होते.याविरुद्ध हायकोर्टात केलेल्या अपिलांवर निकाल देताना न्या. जयमाला बागची व न्या. मौशुमी भट्टाचार्य यांनी म्हटले की, हे खून पूर्ववैमनस्य, वैर, धनाचा लोभ यासारख्या कोणत्याही हेतूने नव्हे तर निव्वळ अंधश्रद्धेतून झाले आहेत. शिक्षणाचा सर्वदूर प्रसार करून जनतेचा दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ बनविणे ही सरकारची घटनादत्त जबाबदारी आहे. एकीकडे आर्थिक विकासाचे ढोल वाजविले जात असताना दुसरीकडे कोलकाता या राजधानीपासून फार दूर नसलेल्या या गावात अंधश्रद्धेतून असे बळी पडावेत हे सरकारचे अपयश आहे. (वृत्तसंस्था)राज्यातील प्रकरणाचा आधारकोलकाता उच्च न्यायालयाने हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सन २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकार वि. दामू गोपीनाथ शिंदे व इतर या प्रकरणात दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला.त्या प्रकरणात कोवळ्या मुलांचा नरबळी दिला तर गुप्तधनाचा लाभ होईल, या अघोरी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आरोपींनी तीन मुलांना ठार मारले होते. सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयानेही हे अन्य खुनांप्रमाणे खून मानून आरोपींना फाशी दिली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते खून अंधश्रद्धेतून झालेले असल्याने आरोपींची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप दिली होती.

टॅग्स :Courtन्यायालय