शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

‘रालोजपा’चे तीन खासदार जदयूमध्ये? बिहारच्या राजकारणात पुन्हा खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 09:06 IST

Bihar politics : रालोजपाचे तीन खासदार जदयूमध्ये जाऊ शकतात, अशा चर्चेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

- एस. पी. सिन्हा

पाटणा : बिहारमध्ये महागठबंधन सरकार येताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीच्या (रालेजपा) खासदारांवर जदयूची नजर आहे. रालोजपाचे तीन खासदार जदयूमध्ये जाऊ शकतात, अशा चर्चेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. चौधरी महेबूब अली कैसर, वीणा देवी व चंदन सिंह यांना जदयूमध्ये नेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.पारस यांचा पक्ष फोडण्यासाठी जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह सक्रिय आहेत. एनडीएला पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या जदयूने रालोजपा फोडण्याच्या प्रयत्नांना वेग दिला आहे. हे तिघे केंद्रीय मंत्र्यांना केव्हाही धक्का देऊ शकतात, असे समजले जात आहे. मागील वर्षी ‘लोजपा’मध्ये फूट पडली होती. पारस यांच्यासह पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंड केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने लोक जनशक्ती पार्टीच्या दोन गटांना वेगवेगळी चिन्हे व नावे दिली होती. चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करणाऱ्यांमध्ये त्यांचे काका पशुपती कुमार पारस, चुलत भाऊ प्रिन्स राज, चंदन सिंह, वीणा देवी व महेबूब अली कैसर यांचा समावेश आहे. चौधरी महेबूब अली कैसर यांचे पुत्र राजदचे आमदार आहेत. 

१२ काँग्रेस आमदारांना हवीत मंत्रिपदेकाँग्रेसच्या १२ आमदारांनी मंत्रिपदे मागितली आहेत. तथापि, काँग्रेसच्या वाट्याला तीन ते चार पदे येऊ शकतात. काँग्रेसच्या आमदारांनी मंत्री होण्यासाठी बिहारचे प्रभारी भक्त चरण दास, प्रदेशाध्यक्ष डॉ. मदन मोहन झा यांच्यापासून ते पक्षश्रेष्ठीपर्यंत आपले दावे सादर केलेले आहेत. आघाडीतील नेत्यांसाेबत चर्चेनंतर मंत्रीवाटपाबाबत स्पष्टता येईल. १६ ऑगस्टला मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे, असे दास म्हणाले.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार