शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अजून तीन राफेल विमाने भारतात दाखल, जामनगर एअरबेसवर केलं दिमाखात लँडिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 00:55 IST

Rafale fighter planes : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यासाठी अजून तीन राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल झाली आहे. बुधवारी रात्री ११ वाजता गुजरातमधील जामनगरच्या हवाई तळावर या विमानांनी दिमाखात लँडिंग केले.

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यासाठी अजून तीन राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल झाली आहे. बुधवारी रात्री ११ वाजता गुजरातमधील जामनगरच्या हवाई तळावर या विमानांनी दिमाखात लँडिंग केले. फ्रान्समधून  निघाल्यानंतर सलग उड्डाण करत ही विमाने भारतात पोहोचली आहेत. यादरम्यान या विमानांनी वाटेत यूएईच्या मदतीने एअर टू एअर रिफ्युएलिंग केले होते. आज दाखल झालेल्या विमानांसोबतच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील एकूण राफेल विमानांची संख्या १४ वर पोहोचली आहे. यापूर्वी ११ राफेल विमाने भारतात आली आहेत. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजून ८ राफेल विमाने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. याशिवाय राफेलचे ट्रेनर व्हर्जनसुद्धा भारतात येणार आहे. भारताने एकूण ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्ससोबत करार केला आहे.  

भारतात सध्या असलेली ११ राफेल विमानं अंबालामध्ये स्वॉड्रन १७ मध्ये दाखल आहेत. या विमानांना चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आलं आहे.  भारत आता लवकरच स्वदेशी पद्धतीनं विकसीत झालेल्या स्टेल्थ फायटर्स अॅडवान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टसोबतच ११४ मल्टीरोल लढाऊ विमानांची ऑर्डर देणार आहे. हवाई दलाची ताकद वाढणारचीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाची ताकद वाढणं हे देशासाठी अतिशय महत्वाचं मानलं जात आहे. आज तीन राफेल लढाऊ विमानांची तुकडी भारतात पोहोचली आहेत. तिनही विमानं जामनगर एअरबेसवर दाखल होणार आहेत. यावेळी विमानांचं जोरदार स्वागत केलं जाईल.  फ्रान्स ते भारत असा तब्बल ७ हजार किमी प्रवास पूर्ण करत राफेल विमानं आज भारतात दाखल झाली आहेत. यूएईमध्ये या विमानांमध्ये 'एअर टू एअर' रिफ्यूलिंग देखील केलं. म्हणजेच यूएईमध्ये या तिनही विमानांमध्ये हवेतच इंधन भरलं गेलं.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलindian air forceभारतीय हवाई दलIndiaभारत