शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना तीन, राहुल गांधींना एका प्रकरणात क्लिन चीट, निवडणूक आयोगाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 06:39 IST

लोकसभा निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तीन प्रकरणांत शुक्रवारी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना तर एका प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना क्लिन चीट दिली.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तीन प्रकरणांत शुक्रवारी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना तर एका प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना क्लिन चीट दिली. काँग्रेस पक्ष हा बुडते टायटनिक जहाज आहे, असे मोदी नांदेडच्या सभेत म्हणाले होते. तसेच वाराणसी व लातूर येथील सभेत त्यांनी केलेल्या विधानांवर विरोधकांनी तक्रार केली होती. याबाबत आयोगाने मोदी यांनी क्लिन चीट दिली आहे. वर्धा येथील सभेत केलेल्या वक्तव्याबाबत मोदींना आधीच दिलासा दिला आहे. त्यामुळेमोदी यांना आतापर्यंत चार प्रकरणांमध्ये दिलासा मिळाला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी असल्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील एका सभेत केला होता. 

या प्रकरणात आयोगाने राहुल यांनाही क्लिन चीट दिली आहे. दरम्यान, मोदी व राहुल गांधी यांच्याविरोधात के लेल्या तक्रारींवर ६ मेच्या आत निर्णय घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला होता. तीन भाषणे महाराष्ट्रातील बालाकोटवर हल्ला चढविणाऱ्या हवाई दलाच्या शूर सैनिकांना मते द्या असेआवाहन मोदी यांनी लातूरच्या सभेत केले होते. वायनाड मतदारसंघात अल्पसंख्याक हेच बहुसंख्याक असल्याचे वादग्रस्त विधान मोदी यांनी वर्धा येथे केले होते. तर नांदेडच्या सभेत ते काँग्रेसला बुडते जहाज म्हणाले होते. या तिन्ही विधानांबाबत निवडणूक आयोगाने मोदी यांना क्लिन चीट दिली आहे. मोदी यांच्या गुजरातच्या पाटणमधील सभेतील विधानाबाबत विरोधकांनी केलेल्या तक्रारीची चौकशी पूर्ण झालेली नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग