श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेत लष्कराला मोठे यश मिळाले आहे. आज बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवद्यांकडून शस्रास्त्रे जप्त करण्यात आली असून, चकमक संपल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
बांदिपोरा येथील चकमकीत लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 19:09 IST