रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात छत्तीसगड सशस्त्र दल व पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या शोधमोहिमेत तीन माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. येथील कारकेली जंगलात सोमवारी संध्याकाळी हे शोध पथक जात असताना, त्यांना एका पुलाखाली हे माओवादी आढळून आले. त्यांना लगेचच अटक करण्यात आली. या माओवाद्यांची नावे, मंगलू, लाला व चैतू अशी असून ते जनमिलितिया या संघटनेचे सदस्य आहेत, असे पोलीस अधीक्षक के.एल. ध्रुव यांनी सांगितले. त्यांच्या जवळून बंदुका, नक्षली साहित्य आदी सामान जप्त करण्यात आले आहे. हे तिघेही लुटमार, पोलिसांवर हल्ले व अन्य गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे सांगितले जाते. (वृत्तसंस्था)
तीन माओवाद्यांना बिजापूरमध्ये अटक
By admin | Updated: November 5, 2014 00:53 IST