शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासहीत 3 जवान शहीद, कुरापती पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 12:29 IST

कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय सैन्यातील तीन जवानांसहीत एक अधिकारी शहीद

श्रीनगर - कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय सैन्यातील तीन जवानांसहीत एक अधिकारी शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शहीद झालेले जवान 120 इन्फंट्री ब्रिगेडमधील आहेत. 

महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झाले आहेत.  मोहरकर हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील होते. त्यांचे वय 32 वर्ष एवढे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अबोली व मोठा आप्त परिवार आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेकटरमध्ये मेजर मोहरकर यांच्या नेतृत्वात नियंत्रण रेषेवर पेट्रोलिंग सुरू असताना पाकिस्ताननं शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. त्यात मेजर मोहरकर यांच्यासह जवान कुलदीप सिंग, जवान परगत सिंग आणि  जवान कुलदीप सिंग शहीद झाले.  

शहीद मेजर प्रफुल मोहरकर यांच्याविषयीची माहिती प्रफुल आंबादास मोहरकर भंडारा जिल्हा पवनी तालुक्यातील जुनोना गावातील रहिवासी होते. अवोली मोहरकर असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे.  तीन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. प्रफुल्ल 6 वर्षांपूर्वी म्हणजे 2012मध्ये इंडियन आर्मीमध्ये भर्ती झाले होते. त्यांचे शिक्षण B.E.पर्यंत झाले होते. प्रफुल्ल दिवाळीमध्ये पावनी येथे आले होते. प्रफुल्ल मोहरकर यांचे वडील आंबादास मोहरकर सेवा निवृत्त शिक्षक आहेत. आईदेखील शिक्षिका आहेत. त्यांचे लहान बंधू परेश मोहरकर पुण्यामध्ये नोकरी करत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली.  केरी सेक्टर परिसरात ही चकमक सुरू होती. यापूर्वी 18 ऑक्टोबरला पूंछ जिल्ह्यात भारतीय लष्काराच्या चौक्यांना पाकिस्ताननं निशाणा साधत हल्ला केला होता. पाकिस्तानच्या या गोळीबारात 7 स्थानिक जखमी झाले होते. पूंछच्या बालाकोटमधील 4 स्थानिक नागरिकही जखमी झाले होते. 

तर दुसरीकडे 2 ऑक्टोबरला पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात जम्मूतील पूंछ सेक्टर परिसरातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका 10 वर्षीय मुलाचाही समावेश होता. तर 5 जण जखमी झाले होते. 

वर्षभरात 900 वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पाकिस्तानने वर्षभरात 900 वेळा जम्मू-कश्मीरमध्ये गोळीबार केला आहे. पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन 780 वेळा नियंत्रण रेषेपलिकडून तर 120 वेळा आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडून जम्मू-कश्मीरमध्ये गोळीबार केला, अशी माहिती भारतीय लष्कारानं दिली आहे.   

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानMartyrशहीद