श्रीनगर : काश्मीरमध्ये गेल्या ४८ तासांत तीन जवान शहीद झाले असून, याच काळात सुरक्षा दलाच्या जवानांनी आठ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. त्यापैकी सहा अतिरेकी गुरुवारी दिवसभरात चकमकीत ठार झाले, तर दोन दहशतवाद्यांना शुक्रवारी ठार करण्यात आले.शुक्रवारी सोपोरमध्ये दोन अतिरेकी मारले गेले. चकमकीत एक जवान शहीद झाला. गुरुवारी रात्री अतिरेक्यांनी त्राल येथील लष्करी तळावर हल्ला केला, त्यात एका जवानाला वीरगती प्राप्त झाली. दगडफेकीत जखमी झालेल्या जवानाचे निधन झाले.
तीन जवान शहीद, आठ अतिरेकी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 05:55 IST