शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचलमधील २२० कोटींच्या शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी तीन आरोपींना कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 04:44 IST

हिमाचल प्रदेशातील २२० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी तीन जणांना अटक केली असून, त्यांना सीबीआय न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत सीबीआय कोठडीत पाठविले आहे.

सिमला : हिमाचल प्रदेशातील २२० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी तीन जणांना अटक केली असून, त्यांना सीबीआय न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत सीबीआय कोठडीत पाठविले आहे.तपास यंत्रणेने उच्चशिक्षण खात्याचे (शिष्यवृत्ती वितरण) अधीक्षक दर्जा-२ चे अधिकारी अरविंद रजता, केसी ग्रुप शिक्षणसंस्था समूहाचे हितेश गांधी व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे माजी लेखापाल एस. पी. सिंग यांना अटक केली. तिघांनाही शनिवारी सीबीआय न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणातील विविध पुरावे गोळा करण्यासाठी या तिघांची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद सीबीआयने न्यायालयात केला.हिमाचल प्रदेश सरकारच्या विनंतीवरून व सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरून सीबीआयने ७ मे २०१९ रोजी या प्रकरणात अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दहावीपूर्व आणि दहावीनंतर दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या वितरणात २०१३-१४ व २०१६-१७ या कालावधीत २२० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेच्या वितरणात गैरव्यवहार बाहेर येताच खळबळ उडाली होती. या प्रकरणात नंतर असेही उघडकीस आले होते की, काही विद्यार्थ्यांचे उत्पन्न व त्यांच्या जातीची प्रमाणपत्रेही खरी नव्हती. याच संबंधात सीबीआयने खाजगी संस्थांच्या २१ ठिकाणांवर धाडी टाकून शोधसत्र हाती घेतले होते. हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा प्राथमिक तपास हिमाचल पोलिसांनी केली होता. नंतर मात्र हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले.२२ शिक्षण संस्थांमधील १० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखली५ डिसेंबर २०१९ रोजी सरकारने मोठा निर्णय घेऊन २२ शिक्षण संस्थांतील १० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखली होती. या शिक्षण संस्थांमधील शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या संस्थांमधील विद्यार्थ्यांचे २०१७-१८ चे नविनीकरण करण्यात येणार नाही. २०१८-१९ चे अर्ज मंजूर करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी एक समिती गठीत केली असून, तिच्या मंजुरीनंतरच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.