शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Zika Virus : झिका व्हायरसचा धोका वाढतोय, दिल्ली-मुंबईसह अनेक शहरे अलर्टवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 10:00 IST

Zika Virus in India : केरळच्या दौर्‍यावर गेलेल्या दिल्ली एम्स टीमने झिका व्हायरसबद्दल देशातील इतर राज्यांनाही सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Zika Virus in India : नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस संकट काळात आणखी एका झिका व्हायरसने चिंता वाढवली आहे. झिका व्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे केरळमध्ये हायअलर्टची स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीहून तज्ज्ञांची टीम केरळकडे रवाना झाली आहे. केरळमध्ये आतापर्यंत सुमारे 18 लोकांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. 

केरळच्या दौर्‍यावर गेलेल्या दिल्ली एम्स टीमने झिका व्हायरसबद्दल देशातील इतर राज्यांनाही सावध राहण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर राजधानी दिल्ली आणि मुंबईसह देशातील अनेक मोठ्या शहरांना अलर्ट केले आहे. केरळच्या शेजारील राज्यांनाही झिका व्हायरसबाबत अलर्ट करण्यात आले आहे.

केरळमध्ये झिका व्हायरसची लागण होणारी पहिली व्यक्ती गर्भवती महिला होती. सध्या ही महिला आणि तिचे बाळ बरे आहेत. झिका व्हायरसचे 19 सॅम्पल पुण्यातील एनआयवीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यातील 13 सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर आम्ही पुन्हा 14 सॅम्पल टेस्टसाठी पाठवले आहेत. त्यामध्ये ते सर्व निगेटिव्ह आले आहेत, असे येथील आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

केरळ सरकार हाय अलर्टवरझिका व्हायरसची लक्षणे आणि परिणामांवर काटेकोरपणे लक्ष ठेऊन आहोत. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी अॅक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनामुळे यापूर्वीच राज्यांची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ केरळ सरकारला अडचणीची ठरू शकते. मात्र, झिका व्हायरस कोरोना इतका प्राणघातक नाही, ही एक दिलासादायक बाब आहे.

झिका व्हायरसची लक्षणे...झिका व्हायरस हा डास चावल्यानंतर पसरणारा आजार आहे. याची लक्षणे चिकनगुनियासारखीच आहेत. हा व्हायरस एडीस डास चावल्यानंतर पसरतो. गर्भधारणेदरम्यान महिलांना जास्त संक्रमण होऊ शकते. ताप आणि शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, स्नायू आणि डोकेदुखीचा त्रास, या आजारामुळे होते.

टॅग्स :Zika Virusझिका वायरसKeralaकेरळHealthआरोग्य