शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो किलो विस्फोटक; 28 ऑगस्टला जमीनदोस्त होणार नोएडातील बेकायदेशीर ट्विन टॉवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 16:54 IST

बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले सुपरटेकचे ट्विन टॉवर 28 ऑगस्ट रोजी पाडण्यात येणार आहे.

नोएडा: अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर नोएडातील ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश देण्यात आले. कोर्टाच्या आदेशानुसार, येत्या 28 ऑगस्ट रोजी सुपरटेकचे नोएडातील बेकायदेशीरपणे बांधलेले ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. रविवारपर्यंत(आज) सुमारे 600 किलो विस्फोटक लावण्यात आली असून, येत्या काही दिवसात दोन्ही टॉवर्समध्ये प्रत्येक मजल्यावर केलेल्या शेकडो छिद्रांमध्ये एकूण 3 हजार सातशे किलोग्रॅम स्फोटके भरली जाणार आहेत. 

एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. कंपनीचे अधिकारी उत्कर्ष मेहता यांच्या म्हणण्यानुसार, हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत आहे. या टीममध्ये सहा परदेशी तज्ज्ञांचाही समावेश असून, टीमला अशाप्रकारे इमारत पाडण्याचा अनुभव आहे. या टीममध्ये दहा भारतीय अभियांत्रिकी तज्ञ आणि तीस मजूर काम करत आहेत. ही टीम दररोज सूमारे 12 तास स्फोटके लावण्याचे काम करत आहेत.

परिसरात मोठा ढिगारा होणारमिळालेल्या माहितीनुसार, इतक्या स्फोटकांच्या मदतीने अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे टॉवर जमीनदोस्त होतील. विशेष म्हणजे, 103 मीटर उंच म्हणजेच 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल. त्या ढिगाऱ्याला उचलायला नंतरचे काही आठवडे लागतील. या इमारती पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत याची धूळ पसरेल. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीने झाकले गेले आहे.  

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाCourtन्यायालय