शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना पार्टीतून बाहेर जायचं आहे, त्यांनी नाटकं करु नयेत - अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 22:02 IST

ज्यांना पार्टीतून बाहेर जायचे आहे, त्यांनी बिनधास्त जावे. परंतु त्यांनी नाटकं करु नयेत असे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले.

लखनऊ, दि. 7 - ज्यांना पार्टीतून बाहेर जायचे आहे, त्यांनी बिनधास्त जावे. परंतु त्यांनी नाटकं करु नयेत असे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले. लखनऊमधील समाजवादी पार्टीच्या ऑफिसमध्ये आज रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी त्यांना राखी बांधली. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “अच्छा हुआ लोग चले गए, पता तो चला अपने कौन हैं और पराए कौन.” गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उत्तरप्रदेशच्या दौ-यावर होते. त्यावेळी समाजवादी पार्टीच्या तीन आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या एका आमदाराने भाजपामध्ये प्रवेश केला. यावर समाजवादीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना अखिलेश यादव यांनी म्हणाले की, ज्यांना पार्टीतून बाहेर जायचे आहे. त्यांनी बिनधास्त जावे, पण नाटकं करु नयेत. यावेळी भाजपामध्ये गेलेले बुक्कल नवाब यांच्यावरही अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, ईदच्या सणानिमित्त बुक्कल नवाब यांच्या घरी गेलो होतो, त्यावेळी ते खूप आनंदी होते. परंतू आता भाजपामध्ये गेल्यानंतर सांगतात की, समाजवादी पार्टीमध्ये खूप घुसमट होत होती.  माझ्या माहितीप्रमाणे एक जमीन प्रकरण आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी सध्या ते भाजपाचा सहारा घेत आहेत. तसेच, बुक्कल नवाब यांच्यासह समाजवादी पार्टीतून बाहेर पडलेल्या सरोजिनी अग्रवाल यांच्यावर सुद्धा अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. दरम्यान,  येत्या 9 ऑगस्टला समाजवादी पार्टीकडून रॅली काढण्यात येणार आहे. ‘ देश बचाओ, देश बनाओ’ असे या रॅलीचे नाव असून रॅलीचे आयोजन खुद्द अखिलेश यादव करणार आहेत.  तर, दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पार्टीचे आणखी तीन आमदार भाजपात जाण्याच्या वाटेवर आहेत.