भुवनेश्वर -केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या अजून एका नेत्याने वंदे मातरमच्या मुद्द्यावरून प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. ज्या लोकांना वंदे मातरम म्हणणे मान्य नाही, अशा लोकांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, असे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी म्हटले आहे. मोदी सरकारमध्ये पशुपालन राज्यमंत्री असलेल्या प्रताप सारंगी यांनी कलम ३७० बाबत आयोजित जनजागृती सभेत हे वक्तव्य केले आहे. सभेला संबोधित करताना कलम ३७० हटवण्याचा निर्णयाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावरही सारंगी यांनी जोरदार टीका केली. प्रताप सारंगी म्हणाले, ''जेव्हा भाजपाच्या विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले तेव्हा काँग्रेसने मात्र त्यावर आक्षेप घेतला होता. आता अमित शहांनी तर पाकिस्तानने बळकावलेले काश्मीरसुद्धा भारताचा भाग, असल्याचे काँग्रेस नेत्यांना ठणकावून सांगितले आहे.''
'वंदे मातरम' म्हणणे मान्य नसलेल्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, मोदी सरकारमधील मंत्र्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 09:18 IST
केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या अजून एका नेत्याने वंदे मातरमच्या मुद्द्यावरून प्रक्षोभक वक्तव्य केले आहे.
'वंदे मातरम' म्हणणे मान्य नसलेल्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, मोदी सरकारमधील मंत्र्यांचा इशारा
ठळक मुद्देवंदे मारतमच्या मुद्द्यावरून केंद्रास सत्तेवर असलेल्या भाजपाच्या अजून एका नेत्याने प्रक्षोभक वक्तव्य ज्या लोकांना वंदे मातरम म्हणणे मान्य नाही, अशा लोकांना भारतात राहण्याचा अधिकार नाहीभाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांची वंदे मातरमवरून आक्रमक भूमिका