शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पुरुषांना मिळणार 730 दिवसांची रजा! लोकसभेत केंद्र सरकारची माहिती, एकल पुरुषालाही मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:27 IST

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्याच्या काळात पती-पत्नी दोघांनीही नोकरी केल्याशिवाय घरखर्च भागणे अशक्य होऊ लागले आहे. परंतु त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही एकल पुरुषही अशा समस्येने ग्रस्त असतात. त्यांना दिलासा देत केंद्र सरकारने महिला आणि एकल पुरुष सरकारी कर्मचारी ७३० दिवसांच्या बाल संगोपन रजेसाठी पात्र आहेत, असे लोकसभेत सांगितले.

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली. केंद्रीय नागरी सेवा (रजा) नियम, १९७२ च्या नियम ४३-सी अंतर्गत, केंद्रीय नागरी सेवा आणि पदांवर नियुक्त केलेल्या महिला सरकारी नोकर आणि एकल पुरुष सरकारी सेवक, बाल संगोपन रजा (सीसीएल)साठी पात्र आहेत. १८ वर्षे वयापर्यंतच्या दोन सर्वात मोठ्या हयात मुलांची काळजी घेण्यासाठी संपूर्ण सेवेदरम्यान जास्तीत जास्त सातशे तीस दिवसांचा कालावधी आणि वेगळ्या अपंग मुलाच्या बाबतीत कोणतीही वयोमर्यादा नाही, असे त्यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. 

सिक्कीमपासून प्रेरणाn आतापर्यंत पुरुषांना बाळाच्या जन्मानंतर किंवा दत्तक घेतल्याच्या ६ महिन्यांच्या आत १५ दिवसांची रजा मिळू शकते. n २०२२ मध्ये महिला पॅनेलने मातांवरचे ओझे कमी करण्यासाठी पितृत्व रजा वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. n सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी त्यांचे सरकार १२ महिन्यांची सुटी देईल, असे सांगितल्यानंतर काही आठवड्यांनंतर लोकसभेत ही घोषणा झाली.

पन्नास आठवड्यांपर्यंत ब्रिटनमध्ये पालकांच्या रजास्पेन : १६ आठवड्यांची पितृत्व रजा मंजूर आहे. स्वीडन : वडिलांसाठी तीन महिन्यांची पालकत्व रजा राखीव आहे. फिनलंड : हा युरोपमधील देश आई व वडीलांनाही १६४ दिवसांची रजा मंजूर. अमेरिका : संघराज्य कायद्यानुसार कोणतीही सशुल्क पितृत्व रजा नाही कॅनडा  : अशा पालकांसाठी पाच अतिरिक्त आठवडे रजेची परवानगी देतो. ब्रिटन : ५० आठवड्यांपर्यंत पालकांच्या रजेला परवानगी आहे.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन