शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 10:48 IST

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणांनी दहशतवादाविरोधातील मोहीम अधिक आक्रमक केली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणांनी दहशतवादाविरोधातील मोहीम अधिक आक्रमक केली आहे. या पार्श्वभूमीवर डोडा जिल्ह्यात चार जणांवर दहशतवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाने गंभीर आरोप निश्चित केले आहेत. या आरोपींवर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोण आहेत 'ते' चार?

गेल्या वर्षी १६ जुलै रोजी देसा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर आता या चौघांविरोधातील खटल्याला अधिक बळ मिळाले आहे. या आरोपींमध्ये मालवासचा मुनीर हुसेन, कुलहंदचा तनवीर अहमद, बग्गर-अस्सारचा नूर आलम आणि हेरानी गावातील कुंज लाल यांचा समावेश आहे.

दाखल झाले गुन्हे!

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौघांनी डोडा परिसरातील दहशतवाद्यांना अन्न, निवारा आणि इतर आवश्यक गोष्टी पुरवून त्यांना थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या मदत केली होती. यावरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात UAPA अंतर्गत कलम १३ (बेकायदेशीर क्रियाकलाप), १६ (दहशतवादी कृत्य), १९ (दहशतवाद्यांना आश्रय), आणि २० (दहशतवादी संघटनेचे सदस्यत्व) तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १०३ (खून), १४७ (भारत सरकारविरोधात युद्ध पुकारणे), १४९ (गैरकायदेशीर जमाव) आणि ३१५ (मालमत्तेचा अप्रामाणिक गैरवापर) अशा गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले.

आरोपींकडून मिळाले पुरावे 

डोडाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संदीप मेहता यांनी सांगितले की, "या प्रकरणाचा तपास व्यावसायिक पद्धतीने केला गेला असून, आरोपींकडून मिळालेल्या पुराव्यांवरून न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप निश्चित केले आहेत."

सध्या हे चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. विशेष एनआयए न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (फास्ट ट्रॅक कोर्ट) यांनी पुराव्यांचा आढावा घेतल्यानंतर आरोप निश्चित केले असून, पुढील खटला लवकरच सुरू होणार आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद