शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'हे मूर्ख बनवणारे विधेयक...;', महिला आरक्षण विधेयकावर आम आदमी पक्षाची भूमिका स्पष्ट, केंद्राकडे केली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 17:36 IST

केंद्र सरकार महिला आरक्षण बीलावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आम आदमी पक्षाने यावरुन आरोप केले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी महिला आरक्षण विधेयकावरुन भाजपवर निशाणा साधला. पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेला संबोधित करताना,  आप नेत्या आतिशी म्हणाल्या, "२०२४ मध्ये विधेयकातील तरतुदी लागू होणार नाहीत. भाजपला महिलांच्या कल्याणात रस नाही.'हे महिला आरक्षण विधेयक नसून महिलांना मूर्ख बनवणारे विधेयक असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

महिला आरक्षण विधेयक सादर, कालावधी १५ वर्षांचा, पाहा किती जागा वाढणार?

मंगळवारी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसद, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभेच्या कनिष्ठ सभागृहात महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्यासंदर्भातील नारीशक्ती वंदन विधेयक लोकसभेत सादर केले.

आप नेत्या आतिशी म्हणाल्या, आमची मागणी महिला आरक्षण विधेयकातून सीमांकन, जनगणना या तरतुदी काढून टाकणे आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आरक्षण लागू करण्याची आहे. परिसीमन आणि जनगणनेच्या तरतुदी का समाविष्ट केल्या आहेत? याचा अर्थ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण लागू होणार नाही.

'जनगणना करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागतो. त्यानंतर सीमांकन प्रक्रिया सुरू होईल. MCD मध्ये सीमांकन होण्यासाठी ६ महिने लागले तर संपूर्ण देशात एक ते दोन वर्षे लागतील, असंही आतिशी म्हणाल्या. आपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी विधेयकाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.चढ्ढा यांनी ट्विट करत टीका केली. महिला आरक्षण आणणार पण तारीख नाही सांगणार, अशी कॅप्शन या ट्विटला दिले आहे."विधेयकातील कलम ५ नुसार, सीमांकन आणि जनगणनेनंतरच त्याची अंमलबजावणी केली जाईल.", याअसंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :AAPआपBJPभाजपा