शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात DJ वाजवू नका अन् दारूही देऊ नका; मिळेल २१ हजारांचे बक्षीस, 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:02 IST

गावाच्या हितासाठी आणि व्यसनमुक्तीची मोहीम म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

भटिंडा : पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील एका गावातील ग्रामपंचायतीने एक अनोखा निर्णय घेतला आहे. भटिंडा जिल्ह्यातील बल्लो गावातील ग्रामपंचायतीने लग्नसमारंभात डीजे न वाजवणाऱ्या आणि दारू न देणाऱ्या कुटुंबाला २१ हजार रुपये रोख देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम पंचायत त्या कुटुंबाला प्रोत्साहन म्हणून देईल. गावाच्या हितासाठी आणि व्यसनमुक्तीची मोहीम म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

बल्लो गावच्या सरपंच अमरजीत कौर यांनी मंगळवारी सांगितले की, गावकऱ्यांनी लग्न समारंभांवर अनावश्यक खर्च करू नये आणि मद्यपानाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, साधारणपणे असे दिसून येते की, गावांमध्ये दारू दिली जाते आणि डिस्क जॉकी (डीजे) द्वारे मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. त्यामुळे भांडणे होतात, असे अमरजीत कौर म्हणाल्या.

याचबरोबर, मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत असल्याचे सरपंच अमरजीत कौर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, लग्न समारंभात व्यर्थ खर्च करू नये यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करू इच्छितो. तसेच, पंचायतीने ठराव केला आहे, ज्यानुसार जर एखाद्या कुटुंबाने दारू दिली नाही आणि लग्न समारंभात डीजे वाजवला नाही तर त्याला २१ हजार रुपये दिले जातील.

५ हजार आहे गावाची लोकसंख्या बल्लो गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास आहे. अमरजीत कौर म्हणाल्या की, पंचायतीने सरकारकडे गावात स्टेडियम बांधण्याची मागणी केली आहे, जेणेकरून युवकांना क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच, गावात स्टेडियम असायला हवे जेणेकरून विविध खेळांचे आयोजन करता येईल. गावात बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही पंचायतीने दिला आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Punjabपंजाबmarriageलग्न