अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनाला गेलेल्या एका भाविकाला पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीने कॅमेरा असलेला हायटेक चष्मा घातला होता. या कारणावरून त्याला अटक केली असून सुरक्षा अधिकारी या व्यक्तीची चौकशी करत आहेत. यामुळे साधा चष्मा घालून राम मंदिरात जाणे गैर नसून अशा प्रकारचे हायटेक चष्मे घालून गेल्यास कारवाई केली जाणार आहे.
या हायटेक चष्म्यामध्ये कॅमेरा, कॉलिंग, ब्लूटूथ आदी फिचर्स मिळतात. तसे पाहिल्यास हा चष्मा हायटेक गॅझेटमध्ये मोडतो. परंतू, याचा वापर रेकी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या भाविकाला अटक करण्यात आली आहे.
रे बॅन या प्रसिद्ध गॉगल कंपनीत्या वेबसाईटवर हा चष्मा ३७९ अमेरिकी डॉलरला मिळत आहे. भारतीय रुपयांत याची किंमत ३२४७३ रुपये होते. यामध्ये व्हॉईस कमांड, टच कंट्रोल आदी गोष्टी आहेत. हा चष्मा वापरणे गुन्हा नसला तरी याचा सुरक्षेच्या दृष्टीने गैरवापरही केला जाऊ शकतो. यामुळे राम मंदिराची सुरक्षा करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने त्या व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.
या चष्म्यामध्ये १२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. तुम्ही डोळ्यासमोर पाहत असलेल्या सर्व गोष्टी हे कॅमेरे रेकॉर्ड करू शकतात. भाविकाकडे आढळलेला हा चष्मा कोणत्या कंपनीचा आहे हे समजू शकलेले नाही. हा चष्मा अन्य कंपनीचा देखील असू शकतो.
या गॉगलच्या स्टीकला स्पिकर्स लावलेले आहेत. यामुळे गाणी देखील ऐकता येतात. तसेच माईकही असल्याने कॉलिंगही करता येते. तुम्ही फोनवर बोलताय हे कोणाला समजणार देखील नाही. तुम्ही मेसेज रेक़ॉर्ड करणे, व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि तो पाठविणे हे देखील एका टचमध्ये करू शकता.