शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:57 IST

गेल्या २७ वर्षांपूर्वी, संबंधित महिलेकडून कळत-नकळत एक मोठा अपराध घडला होता. यामुळे त्यांना स्वस्थ झोपही येत नव्हती. याच्याच पश्चात्तापाचा एक भाग म्हणून आता त्यांनी वाराणसी येथे येऊन हिंदू धर्म स्वीकारला आहे...

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील गंगा नदीच्या काठावर असलेल्या दशाश्वमेध घाटावर एक अनोखे दृश्य बघायला मिळाले. येथे बांगलादेशी मुस्लीम महिलेने सनातन हिंदू धर्म स्वीकारला. लंडनमध्ये वाढलेल्या या महिलेने एका ख्रिश्चन धर्मीय तरुणासोबत लग्न केले होते. गेल्या २७ वर्षांपूर्वी, संबंधित महिलेकडून कळत-नकळत एक मोठा अपराध घडला होता. यामुळे त्यांना स्वस्थ झोपही येत नव्हती. याच्याच पश्चात्तापाचा एक भाग म्हणून आता त्यांनी वाराणसी येथे येऊन हिंदू धर्म स्वीकारला आहे.

या मूळच्या बांगलादेशी मुस्लीम महिलेचे नाव अंबिया बानो असे आहे. त्यांनी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर, संपूर्ण वैदिक विधींसह सनातन धर्म स्वीकारला आहे. त्या लंडनमध्ये राहतात. पुजारी पंडित रामकिशन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, अंबिया यांनी पंचगव्यांने स्वतःची शुद्धी करून घेतली आणि पाच वैदिक ब्राह्मणांच्या मदतीने दशाश्वमेध घाटावर आपल्या न जन्मलेल्या मुलीचे पिंडदान केले. आता त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात म्हणून त्यांचे नाव बदलून अंबिया माला असे करण्यात आले आहे.

अंबिया माला (बदललेले नाव) या ४९ वर्षांच्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे लग्न नेव्हिल बॉर्न ज्युनियर नावाच्या एका ख्रिश्चन तरुणाशी झाले होते. नेव्हिलने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि दोघांनी लग्न केले होते. सुमारे १० वर्षे एकत्रित राहिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. दरम्यान, सुमारे २७ वर्षांपूर्वी, पाश्चात्य विचारसरणीच्या प्रभावाला बळी पडून, अंबिया यांनी गर्भपात करून घेतला होता. त्यावेळी केलेला गर्भपात त्यांना आजपर्यंत स्वस्थ जगू देत नव्हता.

अंबिया यांना २७ वर्षांपूर्वी झालेल्या कृत्याचा प्रचंड पश्चाताप होत होता. त्यांच्या न जन्मलेल्या मुलीचा आत्मा त्यांच्या स्वपनात येऊन वारंवार मुक्तीची अथवा मोक्षाची याचना करत होता. या दुःखाने आणि पश्चात्तापाने त्यांना भारतातील वाराणसी येथे येण्यास प्रवृत्त केले. येथे येऊन त्यांनी त्यांच्या न जन्मलेल्या मुलीचे पिंडदान केले.

अंबिया सांगतात की, प्रचंड संशोधन आणि अभ्यासानंतर, गर्भाशयात वाढणारे मूलही एक जीव असते आणि ते मारणेही पापच आहे, हे आपल्या लक्षात आले. या जाणिवेने अंबिया सनातन धर्माकडे आकर्षित झाल्या. तसेच, प्रत्येक धर्माचे मूळ सनातन धर्मात आहे आणि आता मला आध्यात्मिक शांती मिळत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमWomenमहिलाBangladeshबांगलादेशVaranasiवाराणसी