शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

"देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय...", जी २० परिषदेसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 12:41 IST

जी २० परिषदेसाठी देशातील राज्यांतील मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत दाखल झाले आहे.

नवी दिल्ली : जी २० परिषदेसाठी देशाच्या राजधानीत जागतिक नेत्यांचा कुंभमेळाच जमला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक नेते दिल्लीतील जी २० परिषदेत सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिल्लीत दाखल होणाऱ्या प्रत्येक विदेशी पाहुण्याचे स्वागत केले जात आहे. 

दरम्यान, या जी २० परिषदेसाठी देशातील राज्यांतील मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत दाखल झाले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि.९) दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गाला डिनर कार्यक्रमालाही एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. 

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जी २० देशांची १८ वी शिखर परिषद दिल्लीत पार पडत आहे. या परिषदेसाठी जगभरातील राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना आमंत्रण देण्यात आलेले आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी देखील या परिषदेत सहभागी होत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याचबरोबर, आपल्याला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळणं ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. 

याचबरोबर, देशाचा सर्वांगिण विकास, चंद्रयानचे यश आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणा, यामुळे भारताचा जगभरात लौकिक वाढत आहे. आपली अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या ९ वर्षाच्या काळात अनेक विकासाची कामे देशात झालेली आहेत, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

याशिवाय, जगभरात देशाचं नाव होत असल्यानेच अनेक राष्ट्रप्रमुख दिल्लीत आलेले आहे. देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची देखील भेट घेतली. या भेटीचा फोटो एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत पर्यावरणमंत्री अश्विनी कुमार चौबे हे देखील दिसून येत आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेG20 Summitजी-२० शिखर परिषदNarendra Modiनरेंद्र मोदीRishi Sunakऋषी सुनक