शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

देशात प्रथमच 'असं' घडतंय; एकाच शाळेतील वर्गमित्र झाले दोन सैन्यदलाचे प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 06:24 IST

नवे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी व नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी शिकले एकत्र

नवी दिल्ली - चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर मोहिमांचा मोठा अनुभव असलेले जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी ३०वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. भारत वास्तविक नियंत्रण (एलएसी) सीमांवर असंख्य सुरक्षा आव्हानांना तोंड देत असताना द्विवेदी यांची या पदावर निवड झाली आहे. नवे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी व सध्याचे नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे दोघेही एकत्र शिकले आहेत, हा अनोखा योगायोग या निमित्ताने साधला गेला असून, असे देशात प्रथमच घडले आहे, हे विशेष.

जनरल मनोज पांडे चार दशकांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्यानंतर जनरल द्विवेदी यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. ते १९ फेब्रुवारीपासून लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम करत होते. उपप्रमुख होण्यापूर्वी ते २०२२ ते २०२४ या काळात उत्तरी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम करत होते. जनरल द्विवेदी यांना सर्वांत प्रथम १९८४ मध्ये जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले होते.  चीनशी चालू असलेल्या वाटाघाटींमध्ये ते सक्रियपणे सहभागी झाले होते.

मैत्रीचे बंध मजबूत, सातत्याने संपर्कातभारतीय लष्करी इतिहासात प्रथमच उपेंद्र द्विवेदी आणि ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे दोन वर्गमित्र लष्कर आणि नौदलाच्या प्रमुखपदी विराजमान झाले. दोघांनीही रीवा सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. १९७०च्या दशकाच्या सुरुवातीस ते इयत्ता पाचवी ‘अ’पासून शाळेत एकत्र होते. द्विवेदी यांचा हजेरी क्र. ९३१ आणि त्रिपाठींचा ९३८ होता.  ते सैन्यात वेगवेगळ्या ठिकाणी असतानाही सतत संपर्कात राहिले.

जनरल मनोज पांडे यांंच्याकडून सूत्रे घेताना जनरल उपेंद्र द्विवेदी. उत्तर आर्मी कमांडर म्हणून द्विवेदी यांनी जम्मू-काश्मीरमधील गतिमान दहशतवादविरोधी कारवायांचे आयोजन करण्याबरोबरच उत्तर आणि पश्चिम सीमेवर सततच्या मोहिमांचे नियोजन व अंमलबजावणीसाठी धोरणात्मक मार्गदर्शन केले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदल