शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

'ही तर हुकूमशाहीच; संसदेवर सरकारचा बुलडोझर चालतोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 05:53 IST

खासदारांच्या निलंबनावरून विरोधी पक्षांचे केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभेतील ३३ आणि राज्यसभेतील ४५ विरोधी सदस्यांचे सोमवारी केलेले निलंबन ही ‘हुकूमशाही’ चाल असून, सरकार विरोधकांना चिरडण्यासाठी संसदेवर बुलडोझर चालवत असल्याचे घणाघाती टीकास्त्र ‘इंडिया’ या  विरोधी आघाडीतील घटक पक्षांनी केंद्र सरकारवर सोडले.काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ सदस्यांना सोमवारी  अवमान केल्याच्या आरोपावरून सभागृहातून निलंबित करण्यात आले. त्यापैकी ३० सदस्यांना चालू हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले  आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, प्रथम घुसखोरांनी संसदेवर हल्ला केला. त्यानंतर केंद्र सरकार संसदेवर आणि लोकशाहीवर हल्ला करत आहे. ४७ खासदारांना निलंबित करून निरंकुश केंद्र सरकारकडून सर्व लोकशाही नियम कचऱ्यात टाकले जात आहेत. विरोधाशिवाय संसदेत केंद्र सरकार आता विरोधकांचा आवाज दाबून, कोणत्याही चर्चेशिवाय महत्त्वाचे प्रलंबित कायदे मंजूर करू शकते, असे खरगे म्हणाले.

‘हा तर सन्मान’ सरकारचा प्रयत्न आहे की, विरोधी पक्षांतील जास्तीत जास्त लोकांना निलंबित करून विधेयक मंजूर करा, असे निलंबित खासदार आणि जनता दल (युनायटेड) नेते कौशलेंद्र कुमार म्हणाले. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा म्हणाले की, ‘लोकशाहीच्या या अंधारात निलंबन ही सन्मानाची बाब आहे. जे सरकार संसद भवनातील सुरक्षेतील त्रुटींच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही, ते गलवानवर काय बोलणार?’ उर्वरित खासदारांनाही निलंबित करा...विरोधकमुक्त संसदेबद्दल अभिनंदन, केंद्र सरकार, असे त्यांनी म्हटले आहे.

१३ डिसेंबर रोजी झालेल्या धोकादायक हल्ल्यानंतर विरोधक गृहमंत्र्यांकडून निवेदनाची मागणी करत होते. त्यामुळे सुरुवातीला १३ खासदारांना निलंबित करण्यात आले. आता इंडिया आघाडीच्या ३३ आणखी खासदारांना निलंबित करण्यात आले. यात अनेक पक्षांचे सभागृह नेतेही आहेत. हे केवळ खासदारांचे निलंबन नाही तर लोकशाहीचे आहे.-जयराम रमेश,  सरचिटणीस, काँग्रेस

हे एक हुकूमशाही पाऊल आहे. आम्ही हुकूमशाहीविरुद्ध लढू.-प्रियांका चतुर्वेदी, खासदार, शिवसेना

संसदेतील विरोधी सदस्यांचे निलंबन म्हणजे लोकांचा आवाज दाबणे आहे. खासदारांवरील कारवाई ही लोकशाहीची चेष्टा आहे. ते घाबरले असल्याने त्यांनी एवढ्या खासदारांना निलंबित केले. त्यांनी दोन राज्ये जिंकली म्हणून ते इतके अहंकारी झालेत का? -ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल काँग्रेस आणि मित्रपक्षांनी लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती यांचा अपमान करून त्यांच्या वर्तनाने देशाला लाजीरवाणे केले. विरोधी सदस्यांनी सदनात फलक आणले. सभागृहात फलक घेऊन येण्याची परवानगी नसल्याचा निर्णय घेऊनही जाणूनबुजून संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणला.-पीयूष गोयल, भाजप सभागृह नेते, राज्यसभा

 या सरकारमध्ये हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे. आम्हाला चर्चा करायची होती. मात्र, बहुमताच्या ताकदीच्या जोरावर सर्वांना शांत केले जाईरू, असे सरकारला वाटत आहे.-अधीर रंजन चौधरी, खासदार

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसद