शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Lok Sabha Election 2024 : शशी थरूर यांना मोठा धक्का! तिरुवनंतपुरममध्ये भाजपची मुसंडी, काँग्रेसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 12:11 IST

Thiruvananthapuram Lok Sabha Result 2024 : काँग्रेस उमेदवार शशी थरूर पिछाडीवर. 

Lok sabha Election Result 2024 : केरळमधील तिरुवनंतपुरम लोकसभेची जागा हायव्होल्टेज आहे. इथून काँग्रेसकडून शशी थरूर तर भाजपकडून राजीव चंद्रशेखर लोकसभेच्या मैदानात आहेत. केरळमधील २० लोकसभेच्या जागांपैकी सर्वात प्रतिष्ठित जागांपैकी ही एक आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजप उमेदवार राजीव चंद्रशेखर यांनी चांगली आघाडी घेतली आहे. त्यांनी २४,११८ मतांची आघाडी घेतली असून हा शशी थरूर यांच्यासाठी मोठा धक्का आहे. थरूर मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. या जागेवरून २००९ पासून थरूर खासदार बनले आहेत. (Thiruvananthapuram Seat Election Result 2024) 

दरम्यान, २०१९ मध्ये माजी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शशी थरूर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार थरूर यांना ४,१६,१३१ मते मिळाली. थरूर यांना एकूण ४१.१५% लोकांची मते मिळाली. मागील वेळी भाजपा या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर होती. पक्षाचे उमेदवार कुम्मनम राजशेखरन यांना ३,१६,१४२ म्हणजेच ३१.२६% मते मिळाली. अशाप्रकारे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ९९,९८९ मतांनी विजय मिळवला.

थरूरांच्या विरोधात केंद्रीय मंत्रीमोदी सरकारमध्ये राजीव हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच जलशक्ती मंत्रालयात राज्यमंत्री आहेत. ते भाजपाचे राज्यसभा खासदार असून उद्योजक अशीही त्यांची ओळख आहे. राजीव हे एप्रिल २००६ पासून कर्नाटकमधून राज्यसभेचे सदस्य होते. एप्रिल २०१८ मध्ये ते भाजपाचे सदस्य म्हणून तिसऱ्यांदा सहा वर्षांच्या कालावधीसाठी कर्नाटकमधून राज्यसभेवर पुन्हा निवडून आले.

शशी थरूर सध्या तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते २०१९ मध्ये तिसऱ्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. त्यांनी यापूर्वी केंद्र सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. थरूर यांची संयुक्त राष्ट्रात जवळपास तीन दशकांची कारकीर्द होती. त्यामुळे ते खासदारकीचा चौकार मारणार का हे पाहण्याजोगे असेल.

भाजप उमेदवार चंद्रशेखर प्रथमच लोकसभेच्या मैदानातउद्योगपती आणि तंत्रस्नेही असलेले राजीव चंद्रशेखर हे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योग राज्यमंत्री आहेत. ते २००६ पासून सलग तीनवेळा कर्नाटकातून राज्यसभा सदस्य आहेत. २०१९ मध्ये भाजप या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होता. दक्षिणेत भाजपचा पाया मजबूत करण्यासाठी भाजपचे प्रयत्न चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रशेखर यांना प्रथमच लोकसभेच्या मैदानात उतरविण्यात आले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shashi Tharoorशशी थरूरbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४