शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नाट्य परिषदेच्या सभासद यादीचे संगणकीकरण तेराशे सभासद : मध्यवर्ती शाखेचे काम मात्र कूर्मगतीने

By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST

नाशिक : मागील वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या निवडणुकीत झालेला घोळ लक्षात घेता नाशिक शाखेने सभासद यादीचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले असून, सभासदांची संपूर्ण माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. नाशिक शाखेची सभासदसंख्या १३०० पर्यंत जाऊन पोहोचली आहे.

नाशिक : मागील वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या निवडणुकीत झालेला घोळ लक्षात घेता नाशिक शाखेने सभासद यादीचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले असून, सभासदांची संपूर्ण माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. नाशिक शाखेची सभासदसंख्या १३०० पर्यंत जाऊन पोहोचली आहे.
नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची पंचवार्षिक निवडणूक मागील वर्षी झाली. आरोप-प्रत्यारोपांबरोबरच बोगस मतपत्रिकांवरूनही सदर निवडणूक प्रचंड गाजली होती. निवडणुकीतील सभासद मतदारांची यादी अद्ययावत नसल्याने उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेक शाखेच्या सभासद मतदार यादीत घोळ आढळून आला होता. मयत सभासदांची नावे कायम राहण्याबरोबरच अनेक मतदारांची दोन-तीन ठिकाणी नावे आढळून आली, तर बव्हंशी मतदारांचे पत्ते व भ्रमणध्वनी चुकीचे होते. त्यामुळे अनेक मतदारांच्या हाती मतपत्रिकाच न मिळाल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. निवडणुकीत सभासद मतदारांच्या यादीचा घोळ लक्षात घेता सत्तारूढ झालेले अध्यक्ष मोहन जोशी व कार्यवाह दीपक करंजीकर यांनी मध्यवर्ती शाखेच्या सभासदांची माहिती अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर नाशिक शाखेनेही सभासद यादीचे संगणकीकरणाचे काम सुरू केले होते. नाशिक शाखेचे सदस्य डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी शाखेला मागील वर्षी एक संगणक संच भेट दिला होता. त्यामुळे नाशिक शाखेची मोठी सोय झाली होती. त्यामार्फतच नाशिक शाखेने सर्व सभासदांची संपूर्ण माहिती अद्ययावत केली असून, सर्वच्या सर्व १३०० सभासदांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नाशिक शाखेने संगणकीकरणात आघाडी घेतली असली, तरी मध्यवर्ती शाखेचे काम मात्र अजूनही कूर्मगतीनेच सुरू आहे.
इन्फो
अद्ययावत यादी
नाशिक शाखेचे सुमारे १३०० सभासद असून, त्यांची संपूर्ण माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. वर्षभरात सभासदांच्या नाव, पत्त्यासह दूरध्वनी क्रमांक अद्ययावत करण्यात आले आहेत. मयत सभासदांची नावे वगळण्यात आली आहेत. काही सभासदांची अन्यत्र बदली झाल्याने त्यांची नावे त्यांच्या संमतीनुसार स्थलांतरित करण्यात आली आहेत. अजूनही काही सभासदांना शंका असल्यास त्यांनी आपली नावे अद्ययावत करून घ्यावी.
- सुनील ढगे, कार्यवाह