शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी विध्वंसक असेल; सुत्राच्या वैज्ञानिकांचा दिलासादायक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 08:20 IST

Corona Virus third wave: कोरोना रुग्ण संख्येवर लक्ष ठेवणाऱ्या एका केंद्र सरकारच्या समितीच्या वैज्ञानिकाने ही बाब सांगितली आहे. कोरोनाचे जर कोणते नवीन रुप उत्पन्न झाले तर तिसरी लाट वेगाने पसरू शकते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजविलेला असताना पुढील दोन-तीन महिन्यांत तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही लाट आधीपेक्षा भयंकर असेल असे म्हटले जात आहे. मुलांसाठी धोकादायक असेल असेही अंदाज वर्तविले आहेत. मात्र, कोरोनावरील (corona virus) सरकारी समितीच्या वैज्ञानिकांनी कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्यापेक्षा खूप कमी विध्वंसक असेल असे सांगत मोठा दिलासा दिला आहे. (sutra scientist told about third corona virus wave. )

कोरोना रुग्ण संख्येवर लक्ष ठेवणाऱ्या एका केंद्र सरकारच्या समितीच्या वैज्ञानिकाने ही बाब सांगितली आहे. कोरोनाचे जर कोणते नवीन रुप उत्पन्न झाले तर तिसरी लाट वेगाने पसरू शकते. 'सूत्रा मॉडेल' आणि कोरोनाच्या गणितीय अनुमानामध्ये सहभागी असलेले मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेच्या तीन शक्यता आहेत. एक आशावादी, मध्यवर्ती आणि निराशावादी. 

विज्ञान आणि उद्योग विभागाने गेल्यावर्षी गणितीय मॉडेलचा उपयोग करून कोरोना व्हायरसच्या रुग्ण वाढीचा अंदाज लावण्यासाठी एका समितीचे गठन केले होते. मात्र, या समितीला दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज लावणे जमले नाही आणि कोरोनाची लाट दीड महिने लवकर आली. यामुळे या समितीवर टीकाही झाली होती. ही तीन सदस्यांची समिती आहे. 

तिसऱ्या लाटेचा अंदाज लावताना लसीकरणाचा प्रभाव, कोरोनाचे खतरनाक स्वरूप आणि वेळेचा अंदाज घेण्यात आला आहे. हे दुसऱ्या लाटेच्या अंदाजावेळी करण्यात आले नव्हते. 'आशावादी' मध्ये आम्ही ऑगस्टपर्यंत सामान्य परिस्थिती आणि कोणताही नवीन म्युटेंट येणार नाही, असे गृहीत धरल्याचे अग्रवाल म्हणाले. तर 'मध्यवर्ती'मध्ये आशावादीच्या शक्यता आणि लसीकरण २० टक्के कमी प्रभावी असे गृहीत धरले आहे. तर तिसऱ्या 'निराशावादी' अंदाजामध्ये जर ऑगस्टमध्ये नवीन कोरोनाचा म्यूटंट पसरू लागला तर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. नाहीतर ऑगस्टच्या मध्यावर दुसरी लाट स्थिर होण्याची शक्यता आहे. तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या मध्यावर हाहाकार माजवू शकते. यामध्ये दिवसाला 1,50,000 ते 2,00,000 रुग्ण सापडण्याचा अंदाज आहे. हा अंदाज दुसऱ्या लाटेत सापडलेल्या रुग्णांपेक्षा निम्माहून कमी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या