शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'...तर येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 06:54 IST

पर्रिकरांनी दाखवलेल्या इच्छाशक्तीचं  निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्याकडून कौतुक

पुणे: उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्रबळ इच्छाशक्ती दाखवली. त्यामुळेच सैन्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करता आला, असं मत निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केलं आहे. राजकीय इच्छाशक्ती असल्यास अशा प्रकारच्या धाडसी मोहिमा पूर्ण केल्या जाऊ शकतात. येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो, असं ते पुढे म्हणाले. उरी हल्ल्याचा बदला म्हणून २९ सप्टेंबरला भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. यावर निंभोरकर यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भाष्य केलं. मनोहर पर्रिकर आणखी ४-५ वर्षे संरक्षणमंत्री राहिले असते, तर देशाच्या संरक्षण विभागाचं सामर्थ्य आणखी वाढलं असतं, असं निंभोरकर म्हणाले. 'पर्रिकर यांनी अवघ्या १५ दिवसांत जवानांसाठी १६ हजार कोटींची संरक्षण सामुग्री खरेदी करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आपलं सामर्थ्य ८० टक्क्यांपर्यंत वाढलं,' असं निंभोरकर यांनी सांगितलं. पर्रिकर यांनी सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती दाखवली. मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतरदेखील आपलं सैन्यदल कारवाईस सज्ज होतं. मात्र त्यावेळी राजकीय इच्छाशक्ती कमी पडली, असं ते म्हणाले.  उरी हल्ल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला फोन करुन सर्जिकल स्ट्राइकबद्दल विचारणा केली होती. आपली तयारी असेल, तर लवकरात लवकर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. पर्रिकर यांनी सैन्याला पूर्णपणे सूट दिली होती. त्याशिवाय अत्याधुनिक शस्त्रास्त्रंदेखील दिली होती. यानंतर २९ सप्टेंबरचा दिवस निश्चित करण्यात आला. ती कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली. यामध्ये पर्रिकर यांनी दाखवलेली इच्छाशक्ती महत्त्वाची ठरल्याचं निंभोरकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकManohar Parrikarमनोहर पर्रीकर