शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांना 'धक्के पे धक्का', 24 तासांत तिसरा झटका! आता आठवडाभर पाहावी लागमार वाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 16:56 IST

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केजरीवाल यांची अटक आणि कोठडी कायदेशीर ठरवत त्यांची याचिका फेटाळली होती. तर बुधवारी सकाळी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांची वकिलांशी संबंधित दुसरी याचिकाही फेटाळली. यात केजरीवाल यांनी आठवड्यातून 5 वेळा वकिलांना भेटण्याची परवानगी मागीतली होती.

दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकलेल्या अरविंद केजरीवाल यांना 'धक्के पे धक्के' बसत आहेत. गेल्या केवळ 24 तासांतच त्यांना तीन मोठे झटके बसले आहेत. अटक आणि कोठडीला आव्हान दिलेल्या प्रकरणात मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून, तर बुधवारी वकिलांशी संबंधित एका मागणीसंदर्भातील याचिकेवर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाकडून त्यांच्या हाती केवळ निराशा आली. 

याशिवाय तिसरा झटका म्हणजे, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या अर्जावर लगेच सुनावणी होणार नसल्याची बातमी आली आहे. त्यांना पुढील आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात विशेष खंडपीठ तयार केले जाणार नाही. अशा स्थितीत सोमवारपूर्वी सुनावणी होण्याची शक्यता नाही.

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केजरीवाल यांची अटक आणि कोठडी कायदेशीर ठरवत त्यांची याचिका फेटाळली होती. तर बुधवारी सकाळी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांची वकिलांशी संबंधित दुसरी याचिकाही फेटाळली. यात केजरीवाल यांनी आठवड्यातून 5 वेळा वकिलांना भेटण्याची परवानगी मागीतली होती. सध्या त्यांना आपल्या वकिलांना आठवड्यातून केवळ दोन वेळाच भेटता येते. 

'...म्हणून सोमवारपर्यंत बघावी लागेल वाट' -केजरीवाल यांनी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र त्यांना सुनावणीसाठी पुढील आठवड्यापर्यंत वाट बघावी लागणार असल्याचे दिसते. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर तातडीने सुनावणी होणार नाही. खरे तर, गुरुवारी ईद, शुक्रवारी स्थानिक सुट्टी आणि त्यानंतर शनिवार-रविवारची सुटी आहे. अशा परिस्थितीत सध्या सर्वोच्च न्यायालयात विशेष खंडपीठ स्थापन होणार नाही किंवा सोमवारपूर्वी सुनावणी होण्याचीही शक्यता नाही.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयAam Admi partyआम आदमी पार्टी