शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

लॉकडाऊन कायम ठेवून काही सेवा सुरू करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 5:45 AM

ई-कॉमर्स कंपन्यांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास परवानगी द्यावी की नाही? ४० हजार कोटींच्या अन्य वस्तूं रस्त्यावरील ट्रक आणि कारखान्याबाहेर वितरणासाठी तयार आहेत.

नवी दिल्ली : लॉकडाऊन चालू ठेवून टप्प्याटप्प्यात नियोजनबद्धपद्धतीने काही भागात व्यवहार सुरू करू करण्याची परवानगी द्यावी की नाही, यावर केंद्र सरकार विचार करीत आहे. चाचणीचे प्रमाण वाढविल्यानंतरही दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. संसर्गित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असलेले संवदेशनील अति असुरक्षित भाग सील करून अन्य भागात लॉकडाऊन कायम ठेवायचे. तसेच १५ एप्रिलनंतर कोणत्या भागात व्यवहार सुरू करता येऊ शकतात, अशा भागांची यादीच सरकारकडे आहे.१४ एप्रिलपासून सोंगणीचा हंगाम सुरु होत असल्याने बाजारात अन्नधान्यासह अन्य शेतमालाची आवक होणार असल्याने अन्नप्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा मुद्दा कार्यसूचीत अग्रणी आहे.ई-कॉमर्स कंपन्यांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास परवानगी द्यावी की नाही? ४० हजार कोटींच्या अन्य वस्तूं रस्त्यावरील ट्रक आणि कारखान्याबाहेर वितरणासाठी तयार आहेत. राष्ट्रीय महामार्गावर ट्रक वाहतूक आणि सेवा केंद्र सुरु आहे. तथापि, रस्त्यालगतची हॉटेल्स, खानपानगृह आणि संबंधित व्यवहार बंदआहेत.सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील दारू दुकाने महसूलाचा मुख्य स्रोत आहेत. मर्यादित अवधीसाठी दारूची दुकाने खुली ठेवावीत का? या विषय सरकारच्या विचाराधी आहे. नळ कारागिर, इलेक्ट्रेशियन्स आणि इतर दुरुस्तीशी संबंधित व्यवहार परवान्यासह मर्यादित अवधीत कसे सुरु ठेवता येतील? तसेच अ‍ॅप्सआधारित टॅक्सीसेवा मर्यादित अवधीत सुरु करता येईल का? यासोबतच खाजगी वाहनांना कठोर नियमातहत वाहतुकीसाठी परवानगी देता येईल का? हा मुद्याही सरकारच्या विचाराधीन आहे.मेट्रो आणि बससेवा पूर्णत: बंद ठेवली जाईल; परंतु एका प्रवाशासह तीनचाकी वाहनांना (आॅटोरिक्षा) प्रवासी वाहतुकीची परवागी देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.मोबाईलची दुकाने तसेच मोबाईल फोनशी संबंधित कंपन्यांचे व्यवहार मर्यादित वेळेसाठी सुरू ठेवणे.शेत मजूर आणि कारख्यान्यातील कामगारांना घरातून बाहेर काढणे जरुरी आहे. पण हे कसे करावे, हा मोठा प्रश्न आहे.रेल्वे व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी आवश्यक उद्योग सुरु करणे आणि त्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करणे जरुरी असल्याचे आग्रही मत व्यक्त केले आहे.बव्हंशी इस्पितळे कोरोना रुग्णांनाच प्राधान्य देत आहेत. अन्य आजार असलेले रुग्ण मृत्यू पावत आहेत. या सर्व स्थितीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगट आणि ११ कृती गट विचार करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या