शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

या कार्यालयांनी घेतली सर्वाधिक ‘चिरीमिरी’; केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 13:16 IST

सर्वात कमी तक्रारी एका महत्त्वाच्या विभागात आल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मागील वर्षभरात केंद्रीय गृहमंत्रालयातील कर्मचाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापाठोपाठ रेल्वे आणि बँकांमधील कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी आल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अहवालातून समोर आले आहे. 

केंद्राच्या अखत्यारीतील विविध विभाग व संस्थांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या मागील वर्षभरात एकूण १,१५,२०३ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी ८५,४३७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला, तर २९,७६६ तक्रारी प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे २२,०३४ तक्रारी सुमारे तीन महिन्यांहून अधिक कालावधीपासून प्रलंबित आहे. दाखल झालेल्या तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी गृहमंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांविरोधातील असल्याचे अहवालात नमूद केले. 

अन्य विभागांचे काय?

गत वर्षभरात केंद्रीय गृहनिर्माण तसेच नगरविकास मंत्रालय, दिल्ली विकास प्राधिकरण, दिल्ली मेट्रो रेल निगम, दिल्ली शहरी कला आयोग, हिंदुस्तान प्रीफॅब लिमिटेड, गृह आणि शहरी विकास निगम लिमिटेड, एनबीसीसी आणि एनसीआर योजना मंडळाच्या कर्मचाऱ्यांविरोधात ४,७१० तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ३,८८९ तक्रारींचा निपटारा केला, तर ८२१ तक्रारी प्रलंबित आहेत.

  • २९,७६६ - प्रलंबित तक्रारी
  • २२,०३४ - ३ महिने प्रलंबित

ग्रामविकास विभाग भ्रष्टाचारमुक्त?

मागील वर्षभरात ग्रामविकास विभागाविरोधात भ्रष्टाचाराची केवळ १ तक्रार दाखल झाली आणि तिचाही निपटारा करण्यात आला.

विभागनिहाय सर्वाधिक तक्रारी

विभाग | दाखल | निपटारा | प्रलंबित | ३ महिने+ प्रलंबित

गृह    ४६,६४३    २३,९१९    २२,७२४    १९,१९८रेल्वे    १०,५८०    ९,६६३    ९१७    ९बँक    ८,१२९    ७,७६२    ३६७    ७८ एनसीटी    ७,३७०    ६,८०४    ५६६    १८ कोळसा    ४,३०४    ४०५०    २५४    ७२ कामगार    ४,२३६    ४,०१६    २२०    १५ पेट्रोलियम    २,६१७    २,४०९    २०८    २९ 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणIndiaभारत