शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

... त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याला धर्म संसदेतील संत-महंतांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 13:25 IST

वाराणसी येथे परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 25 ते 27 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल 1008 संत-महंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला साधू-संतांनी विरोध केला आहे. परम धर्म संसंदेतील संतांनी श्रीरामांच्या 221 फुटी पुतळ्याची गरज नसल्याचे म्हटले. तसेच पुतळ्याऐवजी श्रीराम यांचे मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करा, तेही कुठल्याही जातीय वादाशिवाय, असे धर्मगुरुंनी योगींना सुनावले आहे.  त्यामुळे योगींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पास एकप्रकारे घरातून विरोध झाला आहे.     

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळीच योगी आदित्यनाथ यांनी शरयू नदीच्या किनाऱ्यावर प्रभू श्रीराम यांची 221 फुटी उंच मूर्ती उभारणार असल्याची घोषणा केली. तसेच याबाबत उत्तर प्रदेश सरकारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहितीही दिली. त्यानुसार, राम सुतार यांनी साकारलेल्या मूर्तीचीच प्रतिकृतीची निवड या उंच पुतळ्यासाठी करण्यात आली आहे. मात्र, आता परम धर्म संसंदेतील संतांनी यास विरोध केला आहे. 

वाराणसी येथे परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 25 ते 27 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल 1008 संत-महंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यामध्ये, सध्याची हिंदू संस्कृती, हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार याबाबत चर्चा केली. तसेच राम मंदिर, गंगा नदीचे शुद्धीकरण आणि सनातन धर्म यांसारख्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. तर, धर्म संसदेच्या दुसऱ्या दिवशी श्रीरामांचा उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याबद्दल चर्चा करण्यात आली. त्यास, संसदेतील संतानी विरोध केला आहे. अगोदरच देशात सर्वत्र महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. तर, प्रभू श्रीराम हे त्यांचे दैवत आहे. त्यामुळे देवाचा पुतळा उभारायचा नसतो, तर त्यांचे मंदिर उभारायचे असते, असे म्हणत संतांनी श्रीरामांच्या पुतळ्याला आपला विरोध दर्शवला आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथVaranasiवाराणसी