शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; 500 रुपयांच्या नोटेवर लिहिला संदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 12:01 IST

नोटेवर मल्ल्याळम भाषेत मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यावर इंग्रजी भाषेत काही शब्द होते मात्र ते शब्द काही कोड असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या गुरुवायूर मंदिरात पुजा करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मंदिराच्या कार्यालयाला एक लिफाफा पाठविण्यात आला होता. या लिफाफ्यातील पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती अशी माहिती मिळत आहे. एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या माहितीनुसार ही बातमी दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 जून रोजी केरळच्या गुरुवायूर मंदिरात गेले होते. त्याआधी 7 जूनला हे पत्र मंदिराच्या कार्यालयाला पाठविण्यात आलं होतं. मंदिर कार्यालयाला मिळालेल्या लिफाफ्यामध्ये 500 रुपयांची नोट होती. या नोटेवर मल्ल्याळम भाषेत मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यावर इंग्रजी भाषेत काही शब्द होते मात्र ते शब्द काही कोड असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे पत्र मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोदींना जीवे मारण्याची धमकी आल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ माजली आहे. गुप्तचर यंत्रणेने या पत्राला गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे हे पत्र कोणी लिहिलं याची कसून चौकशी करण्यात येत आहे.  

याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाआधी भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाला एक पत्र आलं होतं. ज्यात मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या नावानं हे निनावी पत्र आलं होतं. त्यावर भाजपाच्या मुख्यालयाचा पत्ता देण्यात आला होता. चिठ्ठीत लिहिलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभात त्यांच्या छातीत गोळ्या झाडण्यात येणार आहेत.

ही चिठ्ठी पाठवणाऱ्यानं आपलं नावंही दिलं होतं. त्या चिठ्ठीवर पाठवणाऱ्याचा पत्ताही देण्यात आला होता. या धमकीपत्रात राकेश टांक, भैय्या पारीक, आणखी एकाचा उल्लेख होता. या चिठ्ठीवर देण्यात आलेला पत्ता हा जयपूरचा होता. चिठ्ठीमध्ये जयपूरमधल्या आमेर रोडवरच्या कच्चा बंधा, गणेश कॉलनीतील शिवाड भागाचा पत्ता देण्यात आला होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी चिठ्ठी मिळाल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या हवाली केली होती असं सांगितलं होतं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी