शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर हिंसाचार प्रकरण; सुप्रीम कोर्टातील सुनावणी रद्द, नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 14:44 IST

Manipur Violence Hearing in Supreme Court: मणिपूर हिंसाचाराप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे.

Manipur Violence Hearing in Supreme Court: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेतली असून, सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यातच सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर यासंदर्भातील याचिकांची सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र, ही सुनावणी रद्द करण्यात आली आहे. 

नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट समोर

या प्रकरणावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार होती. परंतु सरन्यायाधीश चंद्रचूड उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या खंडपीठापुढे सुनावणी करता येणार नाही. त्यामुळे मणिपूरच्या प्रकरणावरील शुक्रवारी होणारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे. तत्पूर्वी, मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तर मागितले होते. या प्रकणावर अजून कारवाई का केली नाही? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला विचारला होता. 

दरम्यान, केंद्र सरकारने मणिपूर व्हिडीओ प्रकरणावरील सुनावणीच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. राज्य सरकारची संमती घेतल्यानंतर हे प्रकरण  सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणावर जलद गतीने तपास करणे गरजेचे आहे. तसेच हे प्रकरण राज्याबाहेर चौकशी करण्याची परवानगी देण्याचे आवहन केंद्र सरकाने केले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यापासून  सहा महिन्यांत ट्रायल कोर्टालाही  निर्णय देण्याचे निर्देश द्यावेत,असे आवाहन केंद्र सरकारने या प्रतिज्ञापत्रात केले आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड