शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 19:10 IST

"मी अनुमानांवर विश्वास ठेवत नाही. आम्हाला खात्री आहे की, हायकमांडला परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यांना संधी देण्यासंदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल..."

कर्नाटकचेकाँग्रेस आमदार एच. ए. इक्बाल हुसेन यांनी रविवारी (२९ जून २०२५)  मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानुसार कर्नाटकात मोठा 'उलटफेर' होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना पुढील दोन ते तीन महिन्यांच्या आत राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते, असे हुसेन यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षाच्या अखेरपर्यंत कर्नाटकात नेतृत्व बदल होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच हुसेन यांचे हे विधान आले आहे. हुसेन हे शिवकुमार यांचे अगदी जवळचे मानले जातात.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस आमदार हुसेन म्हमाले, हा विजय मिळवण्यासाठी कुणी संघर्ष केला? कुणी घाम गाळला? हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांची (शिवकुमार यांची) रणनीती आणि कार्यक्रम आता इतिहास आहे. हुसेन रामनगर येथे पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी, शिवकुमार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती? असा प्रश्न केला असता, हुसेन म्हणाले, मी अनुमानांवर विश्वास ठेवत नाही. आम्हाला खात्री आहे की, हायकमांडला परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यांना संधी देण्यासंदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.

यावर, डीके शिवकुमार या वर्षात मुख्यमंत्री होतील? असा प्रश्न केला असता, आमदार इकबाल हुसेन यांनी हो असे उत्तर दिले. एवढेच नाही तर, पुढील दोन ते तीन दिवसांत निर्णय होऊन जाईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र तथा काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार यतींद्र सिद्धारामय्या यांनी मुख्यमंत्री बदलासंदर्भातील चर्चा केवळ अंदाज असल्याचे म्हणत फेटाळली होती. यावर हुसेन म्हणाले, "२०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस हायकमांडने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्ही सर्वजण दिल्लीत एकत्र होतो. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्णय घेतला, हे सर्वांनाच माहित आहे आणि तेच पुढचा निर्णयही घेतील, तोवर आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatakकर्नाटकPoliticsराजकारण