शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून मी उघड्यावर लघुशंकेला गेलो; भाजपा मंत्र्याची सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 18:17 IST

मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरजवळ लघुशंका करणाऱ्या मंत्र्याचा फोटो वायरल

अजमेर: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेचा आग्रह धरत असताना, त्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबवत असताना भाजपाचेच नेते याबद्दल फारसे गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारमध्ये मंत्री असलेले शंभू सिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत ते उघड्यावर लघुशंका करताना दिसत आहे. यावरुन टीका झाल्यावर शंभू सिंह यांनी सारवासारव करत, त्या भागात दूरदूरपर्यंत शौचालय नसल्यानं उघड्यावर गेलो, असं प्रसारमाध्यमांना सांगितलं. उघड्यावर शौचास न जाणं, हा काही स्वच्छता अभियानाचा एकमेव भाग नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. शंभू सिंह यांचा फोटो हे छायाचित्र व्हायरल झाल्यापासून त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. सिंह यांच्या कृतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. पण या प्रकाराचा कुठलाही खेद वा खंत नसलेल्या या मंत्रिमहोदयांनी आधी आपल्या कृतीचं समर्थनच केलं. उघड्यावर लघुशंका करणे ही आपली जुनी परंपरा आहे, असं सिंह म्हणाले. यानंतर सोशल मीडियानं सिंह यांना धारेवर धरलं. 'त्या ठिकाणी कित्येक किलोमीटरपर्यंत स्वच्छतागृह नव्हतं. म्हणून मी उघड्यावर लघुशंकेला गेलो,' अशी सारवासारव त्यांनी केली. विशेष म्हणजे शंभू सिंह ज्या ठिकाणी लघुशंकेला गेले, तिथे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पोस्टर लावण्यात आले होते. वसुंधरा राजे यांचा फोटो असलेल्या पोस्टरच्या बाजूलाच सिंह यांनी लघुशंका केली. त्या पोस्टरच्या बाजूला मंडप घालण्यात आला होता. याच ठिकाणी भाजपाची रॅली होती. शंभू सिंह यांच्या या कृतीमुळे मोदींच्या स्वच्छता अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.   

टॅग्स :BJPभाजपाministerमंत्रीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNarendra Modiनरेंद्र मोदी