शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

तुफान राडा! एका नवऱ्यासाठी 2 बायका रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 14:46 IST

नवऱ्याला पाहण्यासाठी आलेल्या दोन पत्नींमध्ये भांडण झालं. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पतीही तेथे पोहोचला आणि शेवटी दोन्ही पत्नींना त्याने चपलेने चोप दिला.

उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील लोहिया जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिलांनी एकमेकींना बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. कोणाला काही समजण्याआधीच दोघीही एकमेकींवर तुटून पडल्या. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने दोन्ही महिलांना चप्पलेने मारहाण केली. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील हे विचित्र प्रकरण पाहून सर्वच जण हैराण झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याला पाहण्यासाठी आलेल्या दोन पत्नींमध्ये भांडण झालं. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पतीही तेथे पोहोचला आणि शेवटी दोन्ही पत्नींना त्याने चपलेने चोप दिला. महिलांच्या या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोहल्ला मऊ दरवाजा येथील रहिवासी देवेंद्र कुमार यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना किरण आणि पुष्पा अशा दोन पत्नी आहेत.

देवेंद्रला पाहण्यासाठी दोन्ही पत्नी गुरुवारी एकत्र लोहिया रुग्णालयात पोहोचल्या. आपत्कालीन कक्षासमोर किरण आणि पुष्पा यांच्यात बाचाबाची झाली. त्यावरुन दोघींमध्ये वाद झाला. हे प्रकरण वाढल्यावर दोघींमध्ये जोरदार हाणामारी झाली. हा प्रकार कळताच देवेंद्रही रुग्णालयातून बाहेर आला. दोघींच्या भांडणाचा तमाशा पाहत तो काही वेळ उभा राहिला.

पतीने दोघींनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणी ऐकेना मग देवेंद्रने दोन्ही पत्नींना चप्पलने मारहाण केली. यानंतर दोघीही एकमेकींना धमक्या देत निघून गेल्या. देवेंद्रही पुष्पासोबत घरी गेला. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल