शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

होय, जीएसटीमधून मिळणारा महसूल घटला; अर्थमंत्र्यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 22:31 IST

कित्येक दिवसांपासून अडकलेल्या जीएसटीतील हिश्श्याचं केंद्राकडून राज्यांना वाटप

मुंबई: मोदी सरकारकडून दिला जाणारा वस्तू आणि सेवा करातील हिस्सा अनेक दिवसांपासून अडकून पडल्यानं राज्य सरकारांनी तक्रारीचा सूर लावला होता. त्यानंतर अखेर आज केद्रानं ३५ हजार २९८ कोटी रुपयांचं वाटप करत राज्य सरकारांना दिलासा दिला. येत्या काही दिवसांत जीएसटी परिषदेची बैठक होत असल्यानं त्यामध्ये हा मुद्दा गाजण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे मोदी सरकारनं त्याआधीच राज्यांना त्यांचा हिस्सा देऊन संभाव्य संघर्ष टाळला. १८ डिसेंबरला जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपेतर राज्यांचे अर्थमत्री महसुली उत्पन्नाच्या वाट्यावरुन केंद्राला धारेवर धरण्याची शक्यता असल्यानं मोदी सरकारनं आज राज्यांना त्यांचा वाटा दिला. जीएटीतून गोळा होणारा महसूल घटल्यानं त्यामधला वाटा राज्य सरकारांना विलंब झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका माध्यम समूहाच्या कार्यक्रमात बोलताना दिली. जीएसटी महसूल वाढवण्यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत काम करत असल्याचं सीतारामन म्हणाल्या. दोन प्रमुख कारणांमुळे महसुली उत्पन्न घटल्याचं त्या म्हणाल्या. पुराचा फटका बसलेल्या राज्यांना जीएसटी भरण्यास अधिकचा कालावधी देण्यात आला आहे. तर काही क्षेत्रांमधील उत्पादनांना फारशी मागणी नाही, असं सीतारामन यांनी सांगितलं. जीएसटीमधून होणारा महसूल घटत असल्यानं मोदी सरकार जीएसटीचे दर वाढवणार असल्याची चर्चा अर्थ वर्तुळात आहे. त्यावरदेखील सीतारामन यांनी खुलासा केला. जीएसटीचा दर वाढवण्याची चर्चा माझं कार्यालय सोडून सगळ्याच ठिकाणी असल्याचं म्हणत सीतारामन यांनी जीएसटी दरातील वाढीची शक्यता फेटाळून लावली. मात्र जीएसटीमधून झालेली वसुली अपेक्षेपेक्षा कमी असल्याची कबुली त्यांनी दिली.  

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनGSTजीएसटी